TRENDING:

Prakash Raj News: 'मुर्खपणा...', 'स्पिरिट' मधून बाहेर पडण्याच्या अफवांवर प्रकाश राज यांची प्रतिक्रिया

Last Updated:
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित, 'स्पिरिट' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आठ तासांच्या शिफ्टमुळे अभिनेत्री दीपिका पादुकोणमध्ये आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांमध्ये मोठा वाद झाला, त्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणने चित्रपटातून एक्झिट घेतली. आता तिच्यानंतर आणखी एका अभिनेत्याची चित्रपटातून एक्झिट झाली आहे.
advertisement
1/5
'मुर्खपणा...', 'स्पिरिट' मधून बाहेर पडण्याच्या अफवांवर प्रकाश राज यांची प्रतिक्र
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित, 'स्पिरिट' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आठ तासांच्या शिफ्टमुळे अभिनेत्री दीपिका पादुकोणमध्ये आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांमध्ये मोठा वाद झाला, त्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणने चित्रपटातून एक्झिट घेतली. आता तिच्यानंतर आणखी एका अभिनेत्याची चित्रपटातून एक्झिट झाली आहे.
advertisement
2/5
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याची दिग्दर्शकासोबत काही चित्रपटासंबंधित कारणामुळे वाद झाला. त्यामुळे अभिनेत्याने चित्रपटातून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित, 'स्पिरिट' चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता प्रकाश राजने एक्झिट घेतली आहे. अभिनेता प्रकाश राजने आपल्या एक्झिटबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
3/5
सोशल मीडियावर प्रकाश राज यांनी चित्रपटाच्या टीमसोबत मतभेद झाल्यामुळे हा मोठा प्रकल्प सोडल्याची चर्चा सुरू आहे. आता, स्वतः प्रकाश राज यांनी या अफवांवर मौन सोडले आहे. अभिनेत्याने हे दावे पूर्णपणे निराधार असल्याचे फेटाळून लावले आहे. अभिनेत्याने एका मुलाखतीत ही प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
4/5
माध्यमांच्या वृत्तांनुसार असा दावा करण्यात आला की, प्रकाश राज यांनी क्रिएटिव्ह गोष्टींमुळे चित्रपटातून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला. एचटी सिटीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश राज यांनी हे वृत्त 'मूर्खपणा' असल्याचे फेटाळून लावले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मला अशा कोणत्याही बातम्यांची माहिती नव्हती आणि मी चित्रपट सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
advertisement
5/5
प्रकाश राज यांच्या प्रतिक्रियेमुळे चित्रपटाच्या कलाकारांभोवती असलेल्या सर्व अटकळींना पूर्णविराम मिळाला आहे. स्पिरिट चित्रपट टी-सीरीज आणि भद्रकाली पिक्चर्स यांच्या बॅनर खाली तयार केला जात आहे. चित्रपटामध्ये दीपिका पादुकोणची जागा तृप्ती डिमरीने घेतली आहे. विवेक ओबेरॉय आणि कंचना हे सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prakash Raj News: 'मुर्खपणा...', 'स्पिरिट' मधून बाहेर पडण्याच्या अफवांवर प्रकाश राज यांची प्रतिक्रिया
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल