IND vs PAK : जय शाहांचं 'ऑपरेशन पाकिस्तान', PM शरीफना झुकवलं, डील करायला गेले, तोंडावर आपटले!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यूटर्न घेतला आहे. आयसीसीकडून पाकिस्तानच्या कोणत्याही मागण्या मान्य झालेल्या नसल्याचंही सांगण्यात येत आहे.
advertisement
1/7

रविवारी लाहोरमध्ये आयसीसी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या प्रतिनिधींमध्ये बैठक पार पडली. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासोबत चर्चा केली, त्यानंतर भारत-पाकिस्तान सामन्याला हिरवा कंदील मिळाल्याचं वृत्त आहे.
advertisement
2/7
पाकिस्तानने 2024 मध्ये आयसीसीसोबत करार केला आहे, ज्यात त्यांनी भारताविरुद्ध तटस्थ ठिकाणी खेळण्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे पाकिस्तान बहिष्कार टाकू शकत नाही, असं आयसीसीने स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं.
advertisement
3/7
दुसरीकडे पाकिस्तानने भारताविरुद्ध द्विपक्षीय सीरिज सुरू करावी आणि भारत, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये ट्राय सीरिज खेळवली जावी, अशी मागणीही पाकिस्तानने आयसीसीकडे केली.
advertisement
4/7
आयसीसीकडून मिळणाऱ्या महसुलामध्ये वाढ करण्यात यावी. भारत-पाकिस्तान सामन्यात खेळाडूंनी हस्तांदोलन करावं, अशा मागण्याही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केल्याचं वृत्त आहे.
advertisement
5/7
भारत-पाकिस्तान द्विपक्षीय सीरिज, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात ट्राय सीरिज आणि हस्तांदोलन या मागण्या आयसीसीच्या अखत्यारीत येत नाहीत, त्यामुळे या मागण्या मान्य व्हायचा प्रश्न नव्हता.
advertisement
6/7
द्विपक्षीय आणि ट्राय सीरिजबद्दल संबंधित बोर्ड आणि सरकार निर्णय घेतं, तर हस्तांदोलन करायचं का नाही? याचा निर्णय सर्वस्वी टीमचा वैयक्तिक निर्णय असतो.
advertisement
7/7
भारत-पाकिस्तान सामना झाला नाही तर श्रीलंकेच्या महसुलावरही परिणाम झाला असता. मॅचची तिकीटं, हॉटेल बुकिंग, प्रवास तिकीटं, यातून श्रीलंकेला उत्पन्न मिळालं नसतं, त्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पत्र लिहून मॅच खेळण्यासाठी दबाव आणला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : जय शाहांचं 'ऑपरेशन पाकिस्तान', PM शरीफना झुकवलं, डील करायला गेले, तोंडावर आपटले!