प्रिन्स नरुलाने अर्ध्यातच सोडला शो, कोणाशी भिडणार शिव ठाकरे? The 50 ला मिळाले टॉप 4 फायनलिस्ट, कोण आहेत ते?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
The 50 Top 4 Finalist: रिअॅलिटी शोच्या विश्वात सध्या एकाच शोची चर्चा आहे, तो म्हणजे The 50. ५० स्पर्धकांपासून सुरू झालेला हा थरार आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
advertisement
1/9

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या विश्वात सध्या एकाच शोची चर्चा आहे, तो म्हणजे The 50. ५० स्पर्धकांपासून सुरू झालेला हा थरार आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
advertisement
2/9
महालात रंगलेल्या कटकारस्थानांच्या आणि ताकदीच्या खेळातून अखेर ते चार हिरे चमकले आहेत, ज्यांनी मोठ्या दिग्गजांना धूळ चारत 'तिकिट टू फिनाले'वर आपलं नाव कोरलं आहे.
advertisement
3/9
विशेष म्हणजे, प्रिन्स नरुला आणि निक्की तांबोळीसारख्या 'रिअ‍ॅलिटी शो किंग-क्वीन'ना मागे टाकत या चौघांनी बाजी मारली आहे.
advertisement
4/9
अनेक आठवड्यांचा संघर्ष, शारीरिक आणि मानसिक कस पाहणारे टास्क पार केल्यानंतर शोला आपले चार अंतिम खेळाडू मिळाले आहेत.
advertisement
5/9
शिव ठाकरे, मिस्टर फैजू, रजत दलाल, इम्मोर्टल काका यांनी द ५० च्या फिनालेमध्ये धडक मारली आहे.
advertisement
6/9
१८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या सेमीफायनलच्या शूटिंगमध्ये मोठा फेरबदल पाहायला मिळाला. विजयाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे सिवेत तोमर, युविका चौधरी, हामिद बरकजी, आरुषी चावला, लवकेश कटारिया आणि लक्ष्य या ६ खेळाडूंना बाहेरचा रस्ता धरावा लागला.
advertisement
7/9
विशेषतः प्रिन्स नरुला फायनलमध्ये न पोहोचल्याने त्याचे चाहते कमालीचे नाराज झाले आहेत. मात्र, स्वतः प्रिन्स नरुलाने शिव ठाकरेला त्याचं तिकीट टू फिनाले देऊ केल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
8/9
विशेषतः प्रिन्स नरुला फायनलमध्ये न पोहोचल्याने त्याचे चाहते कमालीचे नाराज झाले आहेत. मात्र, स्वतः प्रिन्स नरुलाने शिव ठाकरेला त्याचं तिकीट टू फिनाले देऊ केल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
9/9
या शोचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ ट्रॉफीच नाही, तर विजेत्याला मिळणारी ५० लाखांची रक्कम त्याच्या चाहत्यांसाठी असणार आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर सध्या रजत दलाल आणि मिस्टर फैजू यांच्या समर्थकांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. शिव ठाकरेच्या मराठी फॅन बेसनेही कंबर कसली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रिन्स नरुलाने अर्ध्यातच सोडला शो, कोणाशी भिडणार शिव ठाकरे? The 50 ला मिळाले टॉप 4 फायनलिस्ट, कोण आहेत ते?