TRENDING:

Raqesh Bapat : आधी डिवोर्स, मग ब्रेकअप; राकेश बापटला करायचं आहे दुसरं लग्न! सांगितली कशी हवीये मुलगी

Last Updated:
Raqesh Bapat : अभिनेता राकेश बापटला पुन्हा लग्न करायचं आहे. त्याला कशी बायको हवी आहे हे देखील त्यानं सांगितलं. राकेश नेमकं काय म्हणाला? पाहूयात.
advertisement
1/7
राकेश बापटला करायचं आहे दुसरं लग्न! सांगितली कशी हवीये मुलगी
बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांमधील गप्पा, वाद आणि इमोशनल क्षण नेहमीच दिसत असतात. नुकत्याच समोर आलेल्या एका भागात अभिनेता राकेश बापटने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला. नाश्त्याच्या टेबलावर झालेल्या निवांत गप्पांमध्ये त्याने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला कशी जोडीदार हवी आहे हे देखील सांगितलं. 
advertisement
2/7
राकेश बापटच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. 2011 मध्ये त्याचं लग्न अभिनेत्री रिद्धी डोगराशी झालं होतं. दोघांची जोडी चाहत्यांना आवडत होती. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर मतभेद वाढले आणि अखेर 2019 मध्ये दोघांनी डिवोर्स घेतला.
advertisement
3/7
डिवोर्सनंतर राकेशच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री झाली. बिग बॉस हिंदीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्याची आणि अभिनेत्री शमिता शेट्टीची जवळीक वाढली. शिल्पा शेट्टीची बहिण असलेल्या शमिताबरोबर त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. शोदरम्यान दोघांचं नातं खुललं आणि ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही काळानंतर त्यांचं ब्रेकअप झालं.
advertisement
4/7
आधी लग्न, डिवोर्स आणि ब्रेकअपनंतर राकेश बापटला पुन्हा लग्न करायचं असल्याचं त्यानं सांगितलं. बिग बॉस मराठी 6 त्या घरात राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे आणि दिपाली सय्यद हे तिघे नाश्ता करत बसले होते. गप्पांच्या ओघात विषय लग्नावर आला. त्यावेळी राकेशनं थोड्या मिश्किल अंदाजात त्याच्या मनातील भावना सांगितल्या.
advertisement
5/7
राकेश म्हणाला, "मी कधी लग्न करेन तर एका सिंगरशी करेन. ती रोज रियाज करेल आणि मी ऐकत राहीन." राकेश त्याच्या इमॅजिनेशनमध्ये आणखी रमून गेला आणि म्हणाला, "ती तानपुरा घेऊन उभी आहे. तिचे केस ओले आहेत, साडी नेसली आहे. ती सुंदर, प्युअर भावनांनी गातेय… जणू सरस्वतीच."
advertisement
6/7
राकेशचं बोलणं ऐकून प्राजक्ता आणि दिपालीला हसू आवरलं नाही. राकेशचा हा रोमँटिक अंदाज सध्या सोशल मीडियावरही चर्चेत आला आहे.
advertisement
7/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरात राकेशला त्याच्या स्वप्नातील बायको भेटणार की नाही हे माहिती नाही पण ड्रामा क्विन राखी सावंतनं मात्र बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Raqesh Bapat : आधी डिवोर्स, मग ब्रेकअप; राकेश बापटला करायचं आहे दुसरं लग्न! सांगितली कशी हवीये मुलगी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल