TRENDING:

जवळचे मित्र मानलं, त्यांनीच लुटलं; 'सैराट'च्या 10 वर्षांनी तानाजी गळगुंडेचा मोठा खुलासा

Last Updated:
Sairat Actor Tanaji Galgunde : सैराट फिल्मच्या यशानंतर आलेल्या वाईट अनुभवांबाबत फिल्ममधील लंगड्या म्हणजे अभिनेता तानाजी गळगुंडेने नुकताच एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
advertisement
1/5
जवळचे मित्र मानलं त्यांनीच लुटलं; 'सैराट'च्या 10 वर्षानी तानाजी गळगुंडेचा खुलासा
सैराट फिल्म ही आर्ची आणि परश्याची लव्ह स्टोरी असली तरी त्यात परश्या, सल्या, लंगड्या यांची मैत्रीही पाहायला मिळाली. फिल्ममध्ये कधीही परश्याची साथ देणारा लंगड्या म्हणजेच अभिनेता तानाजी गळगुंडे ज्याने खऱ्या आयुष्यातही मित्रांवर तितकाच जीव ओतला मात्र त्याच मित्रांनी त्याची फसवणूक केली. सैराटनंतर आपल्याला आपल्या जवळच्याच मित्रांनी लुटलं असं त्याने सांगितलं आहे.
advertisement
2/5
सैराट फिल्म एप्रिल 2016 मध्ये रिलीज झाली होती. फिल्म खूप हिट ठरली. या फिल्मला आता 10 वर्षे उलटली. या 10 वर्षांनंतर तानाजी गळगुंडेने मोठा खुलासा केला आहे. सैराटनंतर त्याने त्याच्या मित्रांनी केलेल्या फसवणुकीबाबत सांगितलं आहे.
advertisement
3/5
तानाजी म्हणाला, सैराट चित्रपटानंतर खरं तर माझ्याकडं चांगले पैसे आले होते. या पैशाचं काय करायचं हे माहिती नव्हतं. आपल्या गावाकडील माणसांचं आर्थिक अज्ञान असतं. त्यावेळी काही मित्र आले, कुणी म्हटलं आपण बिझनेस टाकू, पैसे दे, वाढवून देतो, असं म्हटलं. तर कुणी आपल्याला पैशांची गरज नंतर देतो, असं सांगून पैसे मागून घेतले आणि मी सगळे पैसे त्यांनाच देऊ टाकले.
advertisement
4/5
ज्यांनी माझ्याकडून पैसे घेतले ते आता गायब झाले, माझा फोनही उचलत नाहीत, सगळ्यांनी मला ब्लॉक करून टाकलं आहे. मी त्यांना मित्र मानलं होतं, पण ते लोक फक्त पैशासाठी आले होते. त्यांचा दुसरा काहीच उद्देश नव्हता, असं तो म्हणाला.
advertisement
5/5
सैराट फिल्मनंतर गेल्या काही वर्षात तानाजीने अनेक वेगवेगळ्या कलाकृती केल्या आहेत. याच काळात झालेल्या आर्थिक प्रगतीनंतर त्याला वाईट अनुभव आला, त्याने एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत हा अनुभव सांगितला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
जवळचे मित्र मानलं, त्यांनीच लुटलं; 'सैराट'च्या 10 वर्षांनी तानाजी गळगुंडेचा मोठा खुलासा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल