TV अभिनेत्री कृतिका कामरा क्रिकेट होस्टच्या प्रेमात! आहे कोट्यवधींचा मालक, 'इथून' करतो बक्कळ कमाई!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Kritika Karma-Gaurav Kapoor Relationship: १० डिसेंबर रोजी कृतिकाने तिच्या चाहत्यांना एक गोड सरप्राइज दिलं आहे. कृतिकाने आपल्या प्रेमाची कबुली दिली असून तिथे थेट सोशल मीडियावर तिचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
advertisement
1/8

मुंबई: टीव्ही अभिनेत्री कृतिका कामराने 'कितनी मोहब्बत है' आणि 'कुछ तो लोग कहेंगे' सारख्या हिट टीव्ही शोमधून प्रचंड प्रसिद्धी मिळवली. यानंतर तिने वेब सीरिज आणि चित्रपटांकडे लक्ष वळवले. ती 'तांडव', 'बंबई मेरी जान' आणि 'भीड़' यांसारख्या वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये दमदार भूमिका करताना दिसली आहे.
advertisement
2/8
इतकं काम केल्यानंतर कृतिकाने संपूर्ण देशभरात मोठी फॅन फॉलोविंग कमावली. अशातच आज १० डिसेंबर रोजी कृतिकाने तिच्या चाहत्यांना एक गोड सरप्राइज दिलं आहे. कृतिकाने आपल्या प्रेमाची कबुली दिली असून तिथे थेट सोशल मीडियावर तिचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
advertisement
3/8
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कृतिका कामरा आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट गौरव कपूर या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल सुरू असलेल्या चर्चांना कृतिकाने अखेर इन्स्टाग्रामवर 'ब्रेकफास्ट'चा फोटो शेअर करत पूर्णविराम दिला आहे.
advertisement
4/8
दरम्यान, कृतिका ही हिंदी टीव्ही विश्वातील आघाडीची अभिनेत्री असून गौरव कपूर प्रसिद्ध होस्ट आहे. आजवर त्याने अनेक क्रिकेट सामन्यांचं होस्टिंग केलं आहे. अशातच आता या दोघांनी आपलं रिलेशनशिप पब्लिक केल्यानंतर कृतिकाच्या चाहत्यांना गौरवच्या उत्पन्नाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.
advertisement
5/8
कृतिका कामराने गौरव कपूरसोबत ब्रेकफास्ट करतानाचे फोटो शेअर केले, ज्यानंतर त्यांचे रिलेशनशिप कन्फर्म झाले. विशेष म्हणजे, कृतिकाने कॅप्शनमध्ये गौरवच्या सुपरहिट शो 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' चा संदर्भ देत "ब्रेकफास्ट विथ..." असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.
advertisement
6/8
गौरव कपूरचे उत्पन्न केवळ टेलिव्हिजन होस्टिंगवर अवलंबून नाही, तर तो एक अतिशय यशस्वी डिजिटल कंटेंट क्रिएटर आणि यूट्यूबर आहे. 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' (BWC) या शोमुळे त्याला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये तो क्रिकेटर्स आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी अनौपचारिकपणे गप्पा मारतो. या शोच्या अफाट यशामुळे त्याच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ झाली.
advertisement
7/8
गौरव अनेक वर्षे आयपीएल (IPL) च्या ब्रॉडकास्ट पॅनेलचा भाग होता आणि सोनी मॅक्सवरील लोकप्रिय शो 'एक्स्ट्रा इनिंग्स टी२०' चा तो महत्त्वाचा अँकर होता. याशिवाय, ब्रँड एंडोर्समेंट, पॉडकास्टिंग आणि यूट्यूब जाहिरातींमधूनही त्याची मोठी कमाई होते.
advertisement
8/8
गौरव कपूरच्या सर्व स्रोतांचा एकत्रित विचार केल्यास, त्याची अंदाजित एकूण संपत्ती ५ मिलियन डॉलर ते ८ मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास ४० कोटी ते ६५ कोटी रुपयांच्या घरात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
TV अभिनेत्री कृतिका कामरा क्रिकेट होस्टच्या प्रेमात! आहे कोट्यवधींचा मालक, 'इथून' करतो बक्कळ कमाई!