Titanic Disaster : तुम्ही कधी विचारही केला नसेल अशा सुविधांनी सुसज्ज होतं महाकाय 'टायटॅनिक'
- Published by:Digital Desk
- trending desk
Last Updated:
Titanic Disaster : टायटॅनिक जहाज बुडून अनेक वर्षे लोटली. मात्र, अद्याप अनेक गुढ उकलणे बाकी आहेत. (सर्व फोटो : कॅन्वा)
advertisement
1/12

टायटॅनिक या महाकाय जहाजाचा अपघात हा आजही चर्चेचा विषय ठरतो. अत्यंत सुंदर पद्धतीने बांधणी केलेल्या या जहाजाला एका अपघातात जलसमाधी मिळाली. अलीकडच्या काळात टायटॅनिकच्या अपघाताविषयी बऱ्याच गोष्टी प्रकाशात आणण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच खोल समुद्रात विसावलेल्या या जहाजाची वेगवेगळी छायाचित्रे देखील समोर आली आहेत.
advertisement
2/12
टायटॅनिक जहाजात नेमक्या कोणत्या सुविधा देण्यात आल्या होत्या, त्याची बांधणी कशी होती, अपघातावेळची स्थिती काय होती, अपघातानंतर खोल समुद्रात असलेल्या या जहाजाच्या अवशेषाचे फोटोग्राफ नेमकं काय दर्शवतात, अशी विविध प्रकारची खास माहिती सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
3/12
आरएमएस टायटॅनिक 10 एप्रिल 1912 रोजी इंग्लंडमधील साउथॅम्प्टन येथून न्यूयॉर्कला जाण्यासाठी निघाले. हे जहाज कधीच बुडू शकणार नाही, असं मानलं जात होतं. टायटॅनिक एडवर्डियन युगातलं संपन्नता, अभिरुची आणि अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक होते. पण 14 एप्रिलला उत्तर अटलांटिक महासागरामधील एका हिमखंडाला हे जहाज धडकलं. या अपघातात 1500 हून अधिक लोकांचे प्राण गेले. आज 111 वर्षांनंतरही या जहाजाची दुःखद कहाणी चर्चेत आहेत.
advertisement
4/12
अलीकडच्या काही वर्षात या जहाजाचे अनेक फोटो शास्त्रज्ञांनी जगासमोर आणले आहेत. इतिहासातील सर्वात मोठ्या पाण्याखालील स्कॅनिंग प्रकल्पानंतर शास्त्रज्ञांच्या पथकाने संपूर्ण टायटॅनिक जहाजाचे अचूक 3D डिजिटल स्कॅन तयार केले आहेत. यातून या अपघाताचा अधिक तपशील जगासमोर येईल असे मानले जाते. जहाज बुडाले त्या रात्री क्रू आणि प्रवाशांसोबत नेमकं काय घडलं त्याची माहिती उघड होईल, असं शास्त्रज्ञांना वाटतं. या फोटोंमध्ये जहाजाची अवस्था, प्रवाशांचे सामान, न उघडलेल्या शॅम्पेनच्या बाटल्या, पुतळे, दागिने इतर वस्तू पडून असल्याचे दिसते.
advertisement
5/12
मॅगेनल लिमिटेड आणि अटलांटिक प्रॉडक्शनने 2022 मधील उन्हाळयात खोल समुद्रात स्कॅनिंग केले होते. ते या प्रकल्पाविषयी माहितीपट बनवत आहेत. टायटॅनिकचे विश्लेषक पार्क्स स्टीफन्सन या स्कॅनबद्दल म्हणाले, आम्ही प्रथमच जे पाहात आहोत ते सर्व नुकसानग्रस्त वस्तूंचे अचूक चित्रण आहे. आम्हाला वास्तविक डाटा मिळाला आहे. टायटॅनिकच्या आपत्तीच्या खऱ्या कथेपर्यंत पोहोचण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
advertisement
6/12
टायटॅनिक जहाजाची बांधणी अत्यंत देखणी आणि वैशिष्ट्यपूर्ण होती. या जहाजाची बांधणी समुद्र प्रवासाच्या सुवर्णकाळात झाली होती. 20व्या शतकाच्या सुरुवातीला नौकानयन क्षेत्रात व्यवसायासाठी स्पर्धा होती. 1907 मध्ये व्हाईट स्टारलाइनद्वारे टायटॅनिक आणि या जहाजासारखे ऑलिम्पिक आणि ब्रिटानिका जहाजाच्या बांधणीसाठी योजना आखण्यात आली होती. त्यावेळी क्युनार्डसह इतर कंपन्यांकडे आरएमएस लुसिटानिया आणि आरएमएस मॉरेटेनिया सारखी लोकप्रिय प्रवासी जहाजे होती. त्यामुळे टायटॅनिकची स्पर्धा या जहाजांशी होती.
advertisement
7/12
1909 पासून उत्तर आयर्लंडमधील बेलफास्ट येथील हार्लंड आणि वुल्फ शिपयार्डमध्ये टायटॅनिक तयार करण्यासाठी चार वर्षे लागली. त्यावेळी या जहाजाचा बांधणी खर्च होता 1.7 दशलक्ष पौंड (7.4 दशलक्ष डॉलर) म्हणजेच आजच्या खर्चानुसार 147 दशलक्ष पौंड अर्थात 192 दशलक्ष डॉलर होय. यात पूर टाळण्यासाठी 16 वॉटरटाइट कंपार्टमेंट होती. त्यामुळे हे जहाज बुडणार नाही असा विश्वास निर्मात्यांना होता.
advertisement
8/12
अनेक अडथळ्यांना न जुमनता टायटॅनिकचा प्रवास सुरू झाला. अटलांटिक महासागरात जाण्यापूर्वी या जहाजाने दोन थांबे घेतले. उत्तर फ्रान्समधील चेरबर्ग आणि आयर्लंडमधील काउंटी कॉर्कमधील क्वीन्स टाउन येथे कॉल केला होता. साउथॅम्प्टनच्या डॉकपासून जाताना हे जहाज दुसऱ्या जहाजावर कोसळताना वाचले होते.
advertisement
9/12
आरएमएस टायटॅनिक बाहेर जेवढे भव्य होते तेवढेच आतून देखील होते. त्यात भव्य जिना, लोखंडी आणि काचेच्या घुमटाचे छप्पर, ओक पॅनेलिंग होते. 100 फूट लांब प्रथम श्रेणीचे जेवणाचे सलून होते. हे स्थान जहाजाच्या मध्यभागी होते. खोलीला शिसे असलेल्या खिडक्या, जेकोबीन शैलीतील अल्कोव्ह होते. प्रवाशांना जेवणासोबत उत्तम वाइनची निवड करण्याची विशेष सुविधा होती. प्रथम श्रेणीतील प्रवाशांसाठी आ ला कार्टे रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी बुकींग करण्याची सुविधा होती. लहान टेबल क्रिस्टल दिव्यांनी प्रकाशित करण्यात आले होते.
advertisement
10/12
सकाळी आठ ते रात्री अकरा दरम्यान प्रवासी केव्हाही येथे जेवणाचा आनंद घेऊ शकत होते. व्हरांडा कॅफे आणि पाम कोर्ट हे देखील सुंदर होते. दुपारच्या चहासाठी ही सुविधा होती. कॅफे पॅरेसिनमध्ये बसून प्रथम श्रेणीतील प्रवाशांना जेवताना समृद्राचे दृश्य पाहण्याची सुविधा देण्यात आली होती. त्याचप्रमाणे प्रथम श्रेणीतील प्रवाशांसाठी जीमची सुविधा देखील होती. एक डॉलर शुल्क असलेले तुर्की बाथ हे प्रथम श्रेणीतील प्रवाशांसाठी होते. येथे हॉट रुम, कुलिंग रुम आदी लक्झुरियस सुविधा होत्या.
advertisement
11/12
जहाजावर स्विमिंग पूल देखील होता. त्याचप्रमाणे, रिडिंग, स्मोकिंग आणि रायटिंग रुम प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. जहाजातील बी डेकवर सर्वात महागड्या खोल्या होत्या त्यात एक विश्राम गृह, दोन शयनकक्ष, दोन वॉर्डरोब रुम आणि खासगी स्नानगृह होते. त्यात टेलिफोन आणि हीटर्ससारख्या सुविधा होत्या. जहाजावरील लक्झुरियस सुविधांनी काही श्रीमंत, व्यावसायिक, राजकीय व्यक्ती आणि सेलेब्रिटींना आकर्षित केले होते. या जहाजावर लिफ्टचीही सोय होती.
advertisement
12/12
एसएस मेसाबा या जहाजाने टायटॅनिकला मोठ्या हिमखंडाविषयीचा इशारा दिला होता. परंतु 14 एप्रिल रोजी रात्री 11.40 वाजता टायटॅनिक हिमखंडावर आदळले आणि या जहाजाचा अंत झाला. जहाजावर फक्त 20 लाइफबोट्स होत्या. त्यामुळे 1700 क्रू आणि प्रवासी वाचल्याचे बोलले जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Explainer/
Titanic Disaster : तुम्ही कधी विचारही केला नसेल अशा सुविधांनी सुसज्ज होतं महाकाय 'टायटॅनिक'