TRENDING:

Pune Mumbai Expressway: मिसिंग लिंकचं काम कुठपर्यंत आलंय? पाहा Exclusive Photo

Last Updated:
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील गॅस टँकर अपघातानंतर ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प चर्चेत आला आहे.
advertisement
1/7
Pune Mumbai Expressway: मिसिंग लिंकचं काम कुठपर्यंत आलंय? पाहा Exclusive Photo
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात झाल्यानंतर जवळपास 32 तास मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
advertisement
2/7
या घटनेनंतर महामार्गावरील सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यायी मार्गांच्या अभावावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
3/7
या पार्श्वभूमीवर ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘मिसिंग लिंक’ हा मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील सर्वात धोकादायक घाट मार्गाला पर्याय देण्यासाठी प्रस्तावित महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
advertisement
4/7
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Expressway) 'मिसिंग लिंक' प्रकल्प हा ६,६९५ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, खंडाळा घाटातील धोकादायक वळणे वगळून प्रवासाचा वेळ २५-३० मिनिटांनी कमी करणार आहे
advertisement
5/7
या प्रकल्पाअंतर्गत बोगदे (टनेल) आणि उंच पूल (व्हायाडक्ट) उभारून खोपोली ते कुसगाव दरम्यानचा प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद केला जाणार आहे.
advertisement
6/7
मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात असून ते तातडीने पूर्ण करून हा टप्पा लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ही लिंक सुरू झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवासातील अंतरही वाचेल, त्याचप्रमाणे ताज्या घटनेप्रमाणे प्रसंग ओढावला तर पर्यायी वाहतुकीचा मार्गही कामाला येईल, असेही शिंदे म्हणाले.
advertisement
7/7
मिसिंग लिंकचे काम ९५ टक्क्याहून जास्त काम पूर्ण झाले असून येत्या चार महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Pune Mumbai Expressway: मिसिंग लिंकचं काम कुठपर्यंत आलंय? पाहा Exclusive Photo
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल