TRENDING:

BBM6 मध्ये राकेश बापटचे राडे, इथे पुन्हा प्रेमात पडली Ex Wife! घटस्फोटाच्या 7 वर्षांनी रिद्धी बांधणार लग्नगाठ

Last Updated:
Riddhi Dogra : पती राकेश बापटपासून वेगळं होऊन सात वर्ष उलटल्यानंतर आता रिद्धीच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाचे वारे वाहू लागल्याचं बोललं जात आहे.
advertisement
1/8
BBM6 मध्ये राकेश बापटचे राडे, इथे पुन्हा प्रेमात पडली Ex Wife!
टीव्ही विश्वातील ग्लॅमरस अभिनेत्री आणि सध्या 'The 50' या रिअ‍ॅलिटी शोमुळे चर्चेत असलेली रिद्धी डोगरा पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे. पण यावेळी चर्चा तिच्या कामाची नाही, तर तिच्या खाजगी आयुष्याची आहे.
advertisement
2/8
पती राकेश बापटपासून वेगळं होऊन सात वर्ष उलटल्यानंतर आता रिद्धीच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाचे वारे वाहू लागल्याचं बोललं जात आहे. इतकंच नाही, तर ही रिद्धी लवकरच पुन्हा एकदा नवरी म्हणून चाहत्यांच्या समोर येईल, अशा चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
3/8
रिद्धीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या लव्ह लाईफबद्दल अनेक धक्कादायक आणि भावनिक खुलासे केले आहेत. तिने सांगितलं की, ती स्वभावाने प्रचंड रोमँटिक आहे. रिद्धी म्हणाली, "मी प्रेमासाठी पुन्हा एकदा तयार का नसणार? मी प्रेमात पडण्यासाठी कायम ओपन असते. मी इतकी रोमँटिक आहे की, मला कोणाच्याही प्रेमात पडायला फार वेळ लागत नाही."
advertisement
4/8
प्रेमात केलेली सर्वात वेडी गोष्ट कोणती? यावर तिने काळजाला भिडणारं उत्तर दिलं. ती म्हणाली, "एकेकाळी मी माझ्या आत्मसन्मानाची, माझ्या स्वाभिमानाची तमा न बाळगता कोणावर तरी जीवापाड प्रेम केलं. ती कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. कोणासाठीही स्वतःची सेल्फ वर्थ विसरू नका, कारण शेवटी तुमच्याकडे फक्त 'मी नक्की कोण आहे?' हा एकच प्रश्न उरतो."
advertisement
5/8
२०११ मध्ये रिद्धीने अभिनेता राकेश बापट सोबत लग्नगाठ बांधली होती. प्रेक्षकांसाठी ही एक 'मेड फॉर इच अदर' जोडी होती. मात्र, लग्नाच्या ८ वर्षांनंतर दोघांमध्ये खटके उडू लागले. अखेर २०१९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेत आपला संसार संपवला.
advertisement
6/8
रिद्धीने एका पॉडकास्टमध्ये यावर भाष्य करताना सांगितलं की, "आम्ही जोडीदार म्हणून एकमेकांसाठी पूरक नव्हतो, पण मित्र म्हणून आमचं नातं खूप घट्ट होतं. म्हणूनच मैत्री टिकवून ठेवण्यासाठी आम्ही लग्न संपवण्याचा धाडसी निर्णय घेतला." आजही हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
advertisement
7/8
सध्या राकेश बापट बिग बॉस मराठी ६ मध्ये असून त्याच्या खेळाचं कौतुक होत आहे. अशातच त्याची एक्स पत्नी तिच्या आयुष्यात पुढे जात असल्याने राकेशचं नावही चर्चेत आलं आहे.
advertisement
8/8
सध्या सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, रिद्धी एका खास व्यक्तीला डेट करत असून ती लवकरच आपल्या आयुष्याचं नवीन प्रकरण सुरू करणार आहे. जरी तिने त्या व्यक्तीचं नाव अद्याप गुपित ठेवलं असलं, तरी तिच्या बोलण्यातील आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
BBM6 मध्ये राकेश बापटचे राडे, इथे पुन्हा प्रेमात पडली Ex Wife! घटस्फोटाच्या 7 वर्षांनी रिद्धी बांधणार लग्नगाठ
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल