3 ओव्हरमध्ये असा चोपला, वानखेडेवर बार्मी आर्मी चिडीचुप, ब्रुकला घ्यावा लागला मोठा निर्णय!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने नेपाळविरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 184 रनपर्यंत मजल मारली.
advertisement
1/5

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच्या या सामन्यात इंग्लंडकडून जेकब बेथलने 35 बॉलमध्ये 55 रन केले. तर कर्णधार हॅरी ब्रुकने 32 बॉल 53 आणि विल जॅक्सने 18 बॉलमध्ये नाबाद 39 रनची खेळी केली.
advertisement
2/5
इंग्लंडच्या या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या नेपाळने सुरूवातीच्या 3 ओव्हरमध्येच इंग्लंडच्या बॉलिंगवर आक्रमण केलं, त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर उपस्थित असलेले इंग्लंडच्या बार्मी आर्मीचे सपोर्टर एकदमच शांत झाले.
advertisement
3/5
इनिंगच्या पहिल्या ओव्हरमध्ये मार्क वूडच्या बॉलिंगवर नेपाळने सावध सुरूवात केली, पण त्यानंतर दुसऱ्याच ओव्हरला जोफ्रा आर्चरच्या बॉलिंगवर नेपाळने 3 फोर मारत 14 रन केले. कुशल भुरटेलने या ओव्हरमध्ये आर्चरला 3 फोर मारल्या.
advertisement
4/5
यानंतर मार्क वूडच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये नेपाळने एक सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने 15 रन काढले. कुशल भुरटेलने वूडला एक फोर आणि एक सिक्स मारली, तर आसिफ शेखनेही एक फोर मारली.
advertisement
5/5
पहिल्या 3 ओव्हरमध्येच नेपाळचे खेळाडू इंग्लंडच्या फास्ट बॉलिंगवर तुटून पडले, त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकला रणनीतीमध्ये बदल करावा लागला. ब्रुकने इनिंगची चौथी ओव्हर डावखुरा स्पिनर लियाम डॉसनला दिली. यानंतर डॉसनने पहिल्याच ओव्हरला आसिफ शेखची विकेट घेतली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
3 ओव्हरमध्ये असा चोपला, वानखेडेवर बार्मी आर्मी चिडीचुप, ब्रुकला घ्यावा लागला मोठा निर्णय!