TRENDING:

सावधान! 10 फेब्रुवारीला नशिबाची चक्र फिरणार, 'या' राशींच्या लोकांची वाढणार डोकेदुखी; नेमकं काय घडणार?

Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला 'मनाचा कारक' मानले जाते. चंद्राची गती सर्वात वेगवान असून तो दर सव्वा दोन दिवसांनी आपली राशी बदलतो. सोमवार, 10 फेब्रुवारी 2026 रोजी चंद्र तूळ राशीतून बाहेर पडून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.
advertisement
1/7
10 फेब्रुवारीला नशिबाची चक्र फिरणार, 'या' राशींच्या लोकांची वाढणार डोकेदुखी
ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला 'मनाचा कारक' मानले जाते. चंद्राची गती सर्वात वेगवान असून तो दर सव्वा दोन दिवसांनी आपली राशी बदलतो. सोमवार, 10 फेब्रुवारी 2026 रोजी चंद्र तूळ राशीतून बाहेर पडून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.
advertisement
2/7
ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक ही चंद्राची 'नीच' रास मानली जाते, जिथे चंद्र आपली शुभ फळे देण्यास असमर्थ ठरतो. चंद्राच्या या स्थितीमुळे मानवी मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. विशेषतः 3 राशींच्या जातकांसाठी हा काळ मानसिक तणाव आणि आर्थिक आव्हानांचा असू शकतो.
advertisement
3/7
जेव्हा चंद्र आपल्या नीच राशीत असतो, तेव्हा व्यक्तीची निर्णयक्षमता कमकुवत होते. मनामध्ये विनाकारण भीती, अस्वस्थता आणि चिडचिड वाढते. वृश्चिक ही मंगळाची रास असल्याने चंद्र इथे आल्यावर 'मानसिक दाह' निर्माण करतो.
advertisement
4/7
10 फेब्रुवारीच्या या गोचरामुळे लोकांमध्ये भावनिक चढ-उतार पाहायला मिळतील. जे लोक आधीच मानसिक तणावात आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अधिक कठीण जाऊ शकतो.
advertisement
5/7
मेष: मेष राशीच्या लोकांसाठी चंद्र आठव्या भावात भ्रमण करणार आहे. अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे बजेट कोलमडू शकते. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू त्रास देण्याची शक्यता आहे. वाहने चालवताना आणि कोणाशीही बोलताना संयम राखा. वादात पडल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.
advertisement
6/7
वृश्चिक: तुमच्याच राशीत चंद्र नीच अवस्थेत असल्याने तुम्हाला याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. मनामध्ये नकारात्मक विचार घर करतील. जोडीदाराशी लहान गोष्टीवरून मोठे वाद होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार किंवा करारावर स्वाक्षरी करणे 10 फेब्रुवारी रोजी टाळावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
7/7
धनु: धनु राशीसाठी चंद्र बाराव्या भावात असेल, जो व्यय आणि नुकसानीचा मानला जातो. विनाकारण प्रवास करावा लागेल, ज्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. रात्री झोप न येणे किंवा डोळ्यांचे विकार जाणवू शकतात. कोणालाही कर्ज देऊ नका, अन्यथा ते पैसे परत मिळणे कठीण होईल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
सावधान! 10 फेब्रुवारीला नशिबाची चक्र फिरणार, 'या' राशींच्या लोकांची वाढणार डोकेदुखी; नेमकं काय घडणार?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल