उन्हाळा सुरू होताच शरीरात विविध समस्या निर्माण होऊ लागतात. काहींना चेहऱ्यावर मुरुम येणं, ॲलर्जी येणं, पचनाच्या समस्या जाणवणं आणि केस गळणं ही त्यातली काही उदाहरणं. या सर्व उन्हाळी समस्यांची मुळ कारणं आपल्या पोटात असतात. शरीरात साचलेल्या अस्वच्छतेमुळे अनेक आजार होऊ शकतात.
शरीरातील विषारी घटक काढून टाकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी उन्हाळ्यात शरीरातील विषारी घटक काढून टाकण्याचे काही सोपे उपाय आहेत. या उपायांमुळे काही दिवसांतच शरीरातली सर्व अशुद्धता दूर होण्यासाठी मदत होते.
advertisement
लिंबू पाणी - आयुर्वेदानुसार, केवळ आपल्या दैनंदिन दिनचर्येत बदल करून शरीराची स्थिती सुधारता येते. यासाठी दररोज सहा सोपे उपाय करुन पाहता येतील. पहिली पायरी म्हणजे, सकाळी उठल्याबरोबर लिंबू घातलेलं कोमट पाणी पिणं. यामुळे चरबी कमी होण्यास आणि चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. तसंच, शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठीही लिंबू पाणी उपयुक्त ठरू शकतं.
कोरफडीचा गर - एक चमचा ताजा कोरफडीचा गर पाण्यात मिसळून प्या. यामुळे शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकण्याची प्रक्रिया वेगवान होते आणि साचलेली अशुद्धी दूर होण्यास मदत होते.
फळं - नाश्त्यामधे भरपूर फळं खा. सकाळी रिकाम्या पोटी एक वाटी फळं खा. तसंच तुमच्या जेवणात लापशी आणि ओट्सचाही समावेश करा. या पदार्थांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं.
सॅलड - जेवणापूर्वी सॅलड खा. दुपारच्या जेवणापूर्वी एक प्लेट सॅलड घ्या आणि अर्ध्या तासानं जेवण करा.
Summer Care : उन्हाळ्यातही वाटेल थंडगार, शहाळ्याची मलई आणि केळं वापरुन बनवा फ्रेश स्मूदी, पाहा कृती
प्रथिनं आणि फायबर - आहारात प्रथिनं आणि फायबरचं प्रमाण जास्त ठेवा. हे पदार्थ पचायला सोपे असतात आणि यामुळे शरीराला संपूर्ण पोषण मिळतं.
रात्रीचं हलकं जेवण - रात्रीचं जेवण नेहमी हलकं घ्या. रात्री सात वाजण्यापूर्वी जेवण्याचा प्रयत्न करा. रात्री उशिरा खाणं टाळा, कारण रात्री पचनशक्ती मंदावते आणि अन्न पचायला जास्त वेळ लागतो.
इसबगोल आणि दूध - रात्री कोमट दुधात इसबगोल मिसळा. यामुळे सकाळी पोट पूर्णपणे स्वच्छ होईल. शरीरात कोणताही त्रास जाणवत असेल तर तसंच आहारात मोठे बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
