Weather Alert: स्वेटर सोडा, आता AC जोडा, कल्याण-डोंबिवलीत वारं फिरलं, हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: ठाणे-मुंबईसह उपनरांतील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 10 फेब्रुवारी रोजीचं कल्याण-डोंबिवलीतील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील अनेक भागांमध्ये किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ होताना दिसत आहेत. विशेषतः मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उन्हाच्या झळा अधिक जाणवण्याची चिन्हे आहेत. 10 फेब्रुवारी ठाणे जिल्ह्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामानाची स्थिती कशी राहील? जाणून घेऊ.
advertisement
2/5
ठाणे जिल्ह्यातील हवामान अंशतः ढगाळ ते निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सोमवारपासून कमाल तापमान स्थिर असून 30-33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस असेल. सकाळी काहीसा गारवा जाणवेल, परंतु प्रत्यक्ष हवामानात बदल होऊन दुपारी कडक ऊन अनुभवायला येईल.
advertisement
3/5
कल्याण-डोंबिवलीत हवामान प्रामुख्याने स्वच्छ, कोरडे आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. सोमवारच्या तुलनेत किमान व कमाल तापमान स्थिर असून, कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी कडक ऊन असेल, तर सकाळी आणि रात्री हलका गारवा जाणवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी दुपारी कडक उन्हापासून सावधगिरी बाळगावी.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात प्रामुख्याने स्वच्छ, कोरडे आणि उष्ण हवामान असेल. किमान तापमान 18-20 अंश सेल्सिअस तर कमाल तापमानात वाढ झाली असून 36-38 अंश सेल्सिअस राहील. दिवसा हवामान उबदार असून संध्याकाळी गारवा राहील. आजचे हवामान बाहेर फिरण्यासाठी किंवा ग्रामीण भागातील कामांसाठी सुखद असेल.
advertisement
5/5
बदलापूरमधील हवामान काही दिवसांपासून स्थिर आहे. मंगळवारी वातावरण सुखद आणि कोरडे असून कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस असेल. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हवामान स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. दिवसा ऊन राहील, कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस असेल. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: स्वेटर सोडा, आता AC जोडा, कल्याण-डोंबिवलीत वारं फिरलं, हवामान विभागाचा अलर्ट