TRENDING:

Wireless Charging : वायरलेस चार्जिंगमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर खराब होते का? काय आहे यामागचं सत्य

Last Updated:
फक्त पॅडवर फोन ठेवला की चार्जिंग सुरू. दिसायला हे खूप 'कूल' आणि सोयीचं वाटत असलं, तरी अनेकांच्या मनात एक भीती असते की "यामुळे माझ्या महाड्या फोनची बॅटरी तर खराब होणार नाही ना?" किंवा "फोन गरम होऊन स्फोट तर होणार नाही ना?" तुमच्याही मनात असे प्रश्न असतील, तर हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा.
advertisement
1/8
वायरलेस चार्जिंगमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर खराब होते का? काय आहे यामागचं सत्य
आजच्या काळात आपला स्मार्टफोन म्हणजे आपल्या शरीराचाच एक भाग झाला आहे. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फोन आपल्यासोबत असतो. पण या सगळ्यात सर्वात मोठी कसरत असते ती म्हणजे फोन चार्ज करण्याची. ऑफिसला निघताना किंवा रात्री झोपताना चार्जरची केबल शोधणं, ती पिन नीट लावणं हे कधीकधी खूप कंटाळवाणं वाटतं.
advertisement
2/8
या कटकटीतून सुटका करण्यासाठी आता 'वायरलेस चार्जिंग' (Wireless Charging) चं तंत्रज्ञान वेगाने लोकप्रिय होतंय. फक्त पॅडवर फोन ठेवला की चार्जिंग सुरू. दिसायला हे खूप 'कूल' आणि सोयीचं वाटत असलं, तरी अनेकांच्या मनात एक भीती असते की "यामुळे माझ्या महाड्या फोनची बॅटरी तर खराब होणार नाही ना?" किंवा "फोन गरम होऊन स्फोट तर होणार नाही ना?" तुमच्याही मनात असे प्रश्न असतील, तर हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा.
advertisement
3/8
हे 'जादू' सारखं तंत्रज्ञान नक्की काम कसं करतं?वायरलेस चार्जिंग म्हणजे कोणतीही जादू नसून ते 'इंडक्टिव्ह चार्जिंग' (Inductive Charging) या विज्ञानावर आधारित आहे. यात चार्जिंग पॅडच्या आत एक कॉपर कॉइल (तांब्याची तार) असते आणि तशीच एक कॉइल तुमच्या फोनच्या मागे असते. जेव्हा तुम्ही फोन पॅडवर ठेवता, तेव्हा त्यांच्यामध्ये एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते. या चुंबकीय लहरींद्वारे ऊर्जा ट्रान्सफर केली जाते आणि तुमची बॅटरी चार्ज होते. म्हणजेच वीज केबलमधून नाही, तर हवेतून (लहरींद्वारे) फोनपर्यंत पोहोचते.
advertisement
4/8
बॅटरी खराब होते का? काय आहे सत्य?सरळ शब्दात सांगायचं तर, नाही. जर तुम्ही चांगल्या ब्रँडचा आणि दर्जेदार वायरलेस चार्जर वापरत असाल, तर तुमच्या फोनच्या बॅटरीला कोणताही धोका नसतो. आजच्या आधुनिक स्मार्टफोन्समध्ये 'बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम' खूप प्रगत असते. फोन पूर्ण चार्ज झाला की ती आपोआप वीज घेणं थांबवते.
advertisement
5/8
मात्र, जर तुम्ही स्वस्त किंवा अनधिकृत (Fake) चार्जर वापरले, तर व्होल्टेज कमी-जास्त होऊन बॅटरीचं आयुष्य नक्कीच कमी होऊ शकतं.
advertisement
6/8
फोन गरम होणं धोक्याचं आहे का?वायरलेस चार्जिंगमध्ये ऊर्जा ट्रान्सफर होताना थोडी उष्णता निर्माण होणं नैसर्गिक आहे. कारण केबलच्या तुलनेत यात काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात वाया जाते. जर तुमचा फोन हात लावता येणार नाही इतका गरम होत असेल, तर तो चिंतेचा विषय आहे.फोन आणि चार्जिंग पॅड एकमेकांवर नीट ठेवलेले नसतील किंवा चार्जर निकृष्ट दर्जाचा असेल, तर हीटिंगची समस्या वाढते.
advertisement
7/8
वायरलेस चार्जिंगच्या काही मर्यादा1. स्पीड: वायर्ड चार्जिंगच्या तुलनेत वायरलेस चार्जिंग आजही थोडं संथ (Slow) आहे.2. वापर: चार्जिंगवर असताना फोन वापरणं कठीण असतं, कारण तो पॅडवरून उचलला की चार्जिंग थांबतं.3. दबाव: चार्जिंग दरम्यान फोनवर गेम खेळल्यास किंवा जड अ‍ॅप्स वापरल्यास बॅटरीवर अतिरिक्त ताण येतो.
advertisement
8/8
सुरक्षित चार्जिंगसाठी 'या' 4 गोष्टी लक्षात ठेवा:सर्टिफाइड चार्जर: नेहमी 'Qi-Certified' किंवा तुमच्या फोनच्या ब्रँडचेच चार्जर वापरा.कव्हर काढा: जर तुमचा फोन चार्ज होताना खूप गरम होत असेल, तर मागील कव्हर काढून चार्जिंगला लावा.अलाइनमेंट: फोन नेहमी चार्जिंग पॅडच्या बरोबर मध्यभागी ठेवा.नियमित वापर टाळा: घाईच्या वेळी केबलने चार्ज करणं उत्तम. वायरलेस चार्जिंगचा वापर सोयीसाठी म्हणून मर्यादित ठेवावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Wireless Charging : वायरलेस चार्जिंगमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर खराब होते का? काय आहे यामागचं सत्य
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल