TRENDING:

सुप्रिया सुळेंच्या लेकीचं लग्न ठरलं! होणारा जावई कोण? समोर आला PHOTO

Last Updated:
सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि उद्योजक सारंग लखानी यांचे लग्न ठरले असून सुळे आणि पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
advertisement
1/6
सुप्रिया सुळेंच्या लेकीचं लग्न ठरलं! होणारा जावई कोण? समोर आला PHOTO
सुप्रिया सुळे यांच्या घरात आता सनई चौघडे वाजणार आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरात सध्या लग्नाची गडबड सुरू आहे. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचे लग्न ठरलं ठरल्याची माहिती मिळाली आहे. सुप्रिया यांच्या सर्वात जवळच्या मैत्रिणीनं इन्टावर पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली आहे.
advertisement
2/6
खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचे लग्न उद्योजक सारंग लखानी यांच्याशी जुळले आहे. सुप्रिया सुळे यांच्या मैत्रिण स्मृती शिंदे यांनी या लग्नाचा 'गौप्यस्फोट' केल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाली होती.
advertisement
3/6
अखेर खुद्द सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या आनंदाच्या क्षणाची अधिकृत माहिती दिली. सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे यानेही आपल्या बहिणीसाठी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या.
advertisement
4/6
उद्योजक सारंग लखानी आणि रेवती सुळे यांच्या या नव्या प्रवासासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शरद पवार यांच्या नातीचे लग्न ठरल्याने सुळे आणि पवार कुटुंबात लगबग पाहायला मिळू शकते.
advertisement
5/6
अभिनंदन रेवती आणि सारंग असं म्हणत सुप्रिया सुळे यांची मैत्रीण स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर केले. त्यानंतर अनेकांनी अभिनंदन आणि नव्या प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
advertisement
6/6
सारंग लखानी हे विश्वराज ग्रूपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. ही सोयरीक नितीन गडकरींच्या पुढाकारने जमवण्यात आल्याची चर्चा आहे. या दोघांचा विवाह सोहळा कधी होणार आहे याबाबतची माहिती किंवा तारीख अद्याप समोर आलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
सुप्रिया सुळेंच्या लेकीचं लग्न ठरलं! होणारा जावई कोण? समोर आला PHOTO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल