TRENDING:

Gen Z New Trend : आता हे 'Relation-Sipping' म्हणजे काय? जेन झीच्या नव्या ट्रेंडने सर्वांना टाकलं गोंधळात..

Last Updated:
Gen Z New Relationship Trend : हल्ली नातेसंबंधांची व्याख्या बदलत चालली आहे. Gen Z नी तर नात्यांसाठी वेगवेगळ्या चौकटी आणि त्यांची विशेष नावं ठरवली आहेत. दिवसागणिक नवनवीन नात्यांची नावं समोर येतात. कधी सिच्युएशनशिप, कशी ब्रेड क्रंबिंग, कधी घोस्टिंग तर कधी बेंचिंग.. या सर्व टर्म सगळ्यांना कळतीलच अशा नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका नव्या ट्रेंडबद्दल सांगत आहोत. ज्याला रिलेशन सिपिंग (Relation Sipping) म्हणतात.
advertisement
1/7
आता 'Relation-Sipping' म्हणजे काय? जेन झीच्या ट्रेंडने सर्वांना टाकलं गोंधळात
जेन झी लोक जितके जास्त अनाकलनीय तितकेच ते समजूतदार असल्याचे मानले जाते. हे लोक मुळातच निर्भीड आणि प्रॅक्टिकल आहेत. त्यामुळे कोणत्याही अप्रिय नात्यात ही लोकं फार काळ अडकून राहात नाही. म्हणूनच ते आपल्या वेगवेगळ्या अपेक्षांसाठी काही नियम आणि सीमा असलेले नवे रिलेशनशिप ट्रेन निर्माण करतात.
advertisement
2/7
आता जेन झीचा नवा ट्रेंड समोर आला आहे तो म्हणजे, रिलेशन सिपिंग. यामध्ये नात्यात मोठमोठ्या गोष्टी करण्यापेक्षा लहान लहान कृतींकडे लक्ष दिले जाते. यामध्ये जेन झींना शोषल मीडियावर त्यांचे नाते उघडपणे व्यक्त करण्यापेक्षा आपल्या सोबतच्या व्यक्तीच्या वैयक्तिक क्षणांना प्राधान्य द्यायला आवडते. जसं आपण कोणत्याही पेयांचे छोटे छोटे घोट म्हणजेच सिप घेतो, तसेच जेन झींना छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देणारा पार्टनर हवा आहे.
advertisement
3/7
या नात्यात असलेल्या जेन झींना महागड्या वस्तू किंवा खर्चिक भव्य आयोजनापेक्षा त्यांच्या जोडीदारासोबत छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करने महत्त्वाचे वाटते. एका सर्वेक्षणानुसार, 'जवळजवळ एक तृतीयांश तरुण पारंपारिक व्हॅलेंटाईन डेच्या संस्कृतीपासून दूर जात आहेत. ते आता चॉकलेट, टेडी देणं सोशल मीडियावर अतिशयोक्ती करणं याला दिखावा मानतात.'
advertisement
4/7
जेन झींसाठी आता लोकांना आम्ही एकत्र कसे दिसतो किंवा किती खुश आहोत हे दाखवण्यापेक्षा आपलं नातं वैयक्तिक दोघानामध्येच ठेऊन ते फुलवायला आवडतं. त्यांच्यासाठी प्रेम ही फक्त दोन व्यक्तींच्या आपसांतील गोष्ट आहे.
advertisement
5/7
हल्ली जेन झींना कपड्यांचे कौतुक करणे, सकाळी एक गुड मॉर्निंगचा मेसेज, एकमेकांचे आवडते चित्रपट एकत्र पाहणे, संपूर्ण दिवस कसा गेला हे विचारणे, न विचारता एकमेकांचे आवडते पदार्थ किंवा चॉकलेट आणणे, पार्टनरच्या आवडत्या जेवणाच्या ठिकाणी घेऊन जाणे, एकत्र गाणी ऐकणे, एकमेकांची कॉफी ऑर्डर लक्षात ठेवणे.. अशा गोष्टी करायला आवडतात.
advertisement
6/7
हल्ली बहुतांश तरुणांना त्यांचा जोडीदार त्यांचे छोटे छोटे हावभाव समजून घेणारा, त्यांच्या लहानश्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणारा हवा असतो. बरेच तरुण-तरुणी अशाच जोडीदाराच्या शोधत आहेत आणि त्यांना लहान लहान गोष्टी समजून न घेणारा जोडीदार नको आहे.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Gen Z New Trend : आता हे 'Relation-Sipping' म्हणजे काय? जेन झीच्या नव्या ट्रेंडने सर्वांना टाकलं गोंधळात..
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल