TRENDING:

तणाव कमी होतो, त्वचा उजळते, पण... पावसात भिजताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी; अन्यथा होतील 'हे' आजार 

Last Updated:
पावसात भिजल्यामुळे तणाव कमी होतो, मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि त्वचेचा नैसर्गिक ग्लो वाढतो, असे विविध अभ्यासांमधून दिसून आले आहे. काही प्रमाणात इम्युनिटीही वाढते. मात्र...
advertisement
1/9
तणाव कमी होतो, त्वचा उजळते, पण... पावसात भिजताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी!
सध्या अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. बऱ्याच लोकांना पावसात भिजायला खूप आवडतं. पण पावसात भिजण्याचे काही फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. पावसात भिजल्यावर नेमकं काय होतं आणि त्याचा आपल्या शरीराच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तसेच त्याचे दुष्परिणाम काय आहेत, यावर खूप संशोधन झालं आहे.
advertisement
2/9
तणाव आणि चिंता कमी होते : 'जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायकॉलॉजी'मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, पावसाच्या पाण्यात भिजल्याने माणसाच्या शरीरातील तणाव आणि चिंता कमी होते.
advertisement
3/9
मानसिक आरोग्यासाठी चांगले : 'जर्नल ऑफ अफेक्टिव्ह डिसऑर्डर्स'मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, पावसाच्या पाण्यात भिजल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
advertisement
4/9
त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते : 'जर्नल ऑफ कॉस्मेटिक्स, डर्मेटोलॉजिकल सायन्सेस अँड ऍप्लिकेशन्स'मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, पावसाचं पाणी त्वचा स्वच्छ करतं आणि तिला चमकदार बनवतं. त्यात असलेले नैसर्गिक घटक त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
advertisement
5/9
रोगप्रतिकारशक्ती वाढते : 'पीएलओएस वन' (PLOS One) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, पावसाच्या पाण्यातील काही घटक रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
advertisement
6/9
त्वचेचे नुकसान : 'जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ'मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात याच्या उलट काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यानुसार, पावसाचं पाणी शरीराच्या काही भागांतील त्वचेला नुकसान पोहोचवू शकतं, ज्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
advertisement
7/9
आजारांचा धोका : 'सीडीसी' (CDC) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, पावसाच्या पाण्यात जीवाणू (bacteria) आणि विषाणू (viruses) असू शकतात, ज्यामुळे आजार होऊ शकतात.
advertisement
8/9
सर्दी-खोकला आणि श्वासोच्छवासाचे आजार : 'अमेरिकन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ'मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, पावसाच्या पाण्यात भिजल्याने सर्दी आणि खोकला होऊ शकतो, खासकरून ज्यांना आधीपासूनच श्वासोच्छवासाचे आजार आहेत, त्यांच्या समस्या वाढू शकतात.
advertisement
9/9
शरीराचे तापमान कमी होते (Hypothermia) : 'एनआयएच' (NIH) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळलं आहे की, पावसाच्या पाण्यात भिजल्याने तुमच्या शरीराचे तापमान कमी होऊ शकते, ज्यामुळे 'हायपोथर्मिया' (शरीराचे तापमान खूप कमी होणे) होऊ शकतो. वृद्ध आणि शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना याचा धोका जास्त असतो. एकंदरीत, पावसाच्या पाण्यात भिजण्याचे जितके फायदे आहेत तितकेच दुष्परिणामही आहेत. त्यामुळे पावसात भिजताना काळजी घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
तणाव कमी होतो, त्वचा उजळते, पण... पावसात भिजताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी; अन्यथा होतील 'हे' आजार 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल