TRENDING:

Live In Relationship : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहात? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर स्वतःला हरवून बसाल!

Last Updated:
live in relationship-important things for couples : आजच्या काळात लिव्ह-इन रिलेशनशिप ही संकल्पना हळूहळू स्वीकारली जात आहे. लग्नाआधी एकमेकांना समजून घेण्यासाठी, स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांचा समतोल साधण्यासाठी अनेक जोडपी हा पर्याय निवडतात. मात्र लिव्ह-इन रिलेशनशिप जितकी सोपी वाटते तितकी ती नसते. यात भावनिक, आर्थिक आणि मानसिक पातळीवर समजूतदारपणा फार महत्त्वाचा असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगत आहोत.
advertisement
1/9
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहात? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर स्वतःला हरवून बसाल
एकाच छताखाली राहणे म्हणजे फक्त प्रेम आणि रोमँटिक क्षण नाहीत, तर रोजच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या गोष्टी, मतभेद आणि जबाबदाऱ्या यालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे नातं टिकवायचं असेल तर काही नियम, स्पष्टता आणि परस्पर आदर ठेवणे गरजेचे ठरते.
advertisement
2/9
पैशांबाबत स्पष्टता : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या कपल्ससाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशांबाबत स्पष्टता. खर्च, भाडे, बिल्स, सेव्हिंग्स याबाबत सुरुवातीलाच चर्चा करून नियम ठरवा. कोण किती खर्च करणार, कोणत्या गोष्टी शेअर करायच्या हे आधीच ठरवले तर भविष्यात गैरसमज टळतात.
advertisement
3/9
घरातील कामांचे नियोजन : घरातली कामं ही केवळ एकाच व्यक्तीची जबाबदारी नसतात. स्वयंपाक, साफसफाई, किराणा आणणे अशा रोजच्या कामांची विभागणी करा. यामुळे एकमेकांवरचा ताण कमी होतो आणि नात्यात समानतेची भावना निर्माण होते.
advertisement
4/9
समजून घेणं आणि आदर : नात्यात अडचणी येणं स्वाभाविक आहे. मतभेद, वाद किंवा गैरसमज झाले तर त्यातून पळ काढण्याऐवजी एकत्र बसून चर्चा करा. कठीण काळात एकमेकांचा हात धरून उभं राहणं हेच नात्याला मजबूत बनवतं. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असताना एकमेकांच्या इच्छा, भावना आणि कल्पनांना समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या पार्टनरच्या फॅन्टसीज किंवा अपेक्षा ऐकून घेणं, त्यांचा आदर करणं यामुळे नात्यातील जवळीक वाढते.
advertisement
5/9
प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणे : प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं टाळा. छोट्या गोष्टींवरून भांडणं वाढवण्याऐवजी थोडं समजून घेणं आणि सोडून देणं शिकणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी परफेक्ट असणं शक्य नसतं, हे स्वीकारा.
advertisement
6/9
आर्थिक सुरक्षितता : फक्त खर्चच नाही तर बचतही तितकीच महत्त्वाची आहे. भविष्यासाठी पैसे साठवणं, आपत्कालीन परिस्थितीसाठी सेव्हिंग ठेवणं हे दोघांसाठीही फायदेशीर ठरतं. आर्थिक सुरक्षितता नात्याला स्थैर्य देते.
advertisement
7/9
नात्यात काही सीमारेषा ठरवा : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये काही सीमारेषा ठरवणं खूप गरजेचं आहे. वैयक्तिक स्पेस, मित्र-मैत्रिणी, कुटुंब, करिअर याबाबत स्पष्ट नियम ठेवा. सीमारेषा असतील तर नातं अधिक हेल्दी राहतं.
advertisement
8/9
या प्रकारच्या सहवासाला एक मर्यादा ठरवा : शेवटी, लिव्ह-इन रिलेशनशिपला एक कालमर्यादा ठेवा. हे नातं कुठे जाणार आहे, भविष्यात लग्न करायचं आहे की नाही, यावर स्पष्टता असणं महत्त्वाचं आहे. अनिश्चिततेत नातं टिकवणं दोघांसाठीही त्रासदायक ठरू शकतं.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Live In Relationship : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहात? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर स्वतःला हरवून बसाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल