होलसेल दरात करायचीय शॉपिंग? मुंबईतील हे 4 मार्केट आहेत बेस्ट पर्याय
- Published by:Aaditi Datar
- local18
Last Updated:
शॉपिंगसाठी मुंबईमध्ये होलसेल मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याचं मार्केटबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
advertisement
1/6

शॉपिंग अर्थात खरेदी हा मुली आणि महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय मानला जातो. ज्यांना शॉपिंगची फारच आवड आहे अशा व्यक्ती तर, किफायतशीर किमतींमध्ये जास्तीत जास्त चांगले कपडे आणि अॅक्सेसरीज कुठे मिळतील अशा ठिकाणांच्या शोधातच असतात.
advertisement
2/6
अशा व्यक्तींसाठी मुंबईमध्ये होलसेल मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याचं मार्केटबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
advertisement
3/6
क्रॉफर्ड मार्केट : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी असलेले हे क्रॉफर्ड मार्केट होलसेल दरांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी रोजच्या जीवनात लागणारी प्रत्येक गोष्ट स्वस्त दरात मिळते. या ठिकाणी अगदी 10 रुपयांपासून वस्तू उपलब्ध आहेत.
advertisement
4/6
भुलेश्वर मार्केट: मुंबईचे हे भूलेश्वर मार्केट लग्न सरायीसाठी लागणाऱ्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अगदी होलसेल दरात युनिक दागिने मिळतात. त्याचप्रमाणे ज्यांना उद्योग धंदा करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी दागिने अवघ्या 1 रुपयांपासून उपलब्ध आहेत.
advertisement
5/6
फॅशन स्ट्रीट मार्केट: मुंबईच्या आझाद मैदानाजवळील हे फॅशन स्ट्रीट मार्केट ट्रेंडिंग कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मिळणारे कपडे फार स्वस्त मिळतात. येथे मिळणारे कपडे अवघ्या 100 रुपयांपासून उपलब्ध आहेत.
advertisement
6/6
हिंदमाता मार्केट: दादरमध्ये असलेल्या या हिंदमाता बाजारपेठेची ख्याती पूर्ण महाराष्ट्रात आहे. हे हिंदमाता मार्केट महिलांच्या होलसेल साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मिळणाऱ्या साड्या अगदी स्वस्त दरात मिळतात.या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे येथे साड्या 150 रुपयांपासून सुरू होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
होलसेल दरात करायचीय शॉपिंग? मुंबईतील हे 4 मार्केट आहेत बेस्ट पर्याय