TRENDING:

महादेवाची पूजा करताना 99% लोक करतात 'या' चुका, पाचवी चूक तर टाळाच; अन्यथा वर्षभर भोगावे लागतील परिणाम!

Last Updated:
शिवपूजेत श्रद्धेसोबतच काही नियमांचे पालन करणेही आवश्यक असते. शास्त्रानुसार, काही अशा चुका आहेत ज्या केल्यास महादेवाचा कोप होऊ शकतो किंवा पूजेचे पूर्ण पुण्य मिळत नाही.
advertisement
1/7
महादेवाची पूजा करताना 99% लोक करतात 'या' चुका, पाचवी चूक तर टाळाच
हिंदू धर्मात महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा पावन दिवस यावर्षी रविवार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी लाखो भक्त उपवास करतात आणि शिवलिंगावर अभिषेक करतात. मात्र, शिवपूजेत श्रद्धेसोबतच काही नियमांचे पालन करणेही आवश्यक असते. शास्त्रानुसार, काही अशा चुका आहेत ज्या केल्यास महादेवाचा कोप होऊ शकतो किंवा पूजेचे पूर्ण पुण्य मिळत नाही.
advertisement
2/7
बेलपत्र: आपण शिवलिंगावर बेलपत्र वाहतो पण ते वाहताना काही चुका टाळायच्या असतात. जस की बेलपत्र हे नेहमी सुस्थितीत म्हणजेच पान गळलेल, किंवा तुटलेल नसावं. तसेच शिवलिंगावर बेलपत्र वाहताना गुळगुळीत भाग अर्पण करावा.
advertisement
3/7
तुटलेले किंवा पिवळे तांदूळ: महादेवाची पूजा करताना अनेक जण ही चूक हमखास करतात. आपण महादेवाची पूजा करताना अक्षता वाहतो पण हे करताना, अख्खा तांदूळ आणि शुभ्र पांढरा तांदूळ वापरावा. पिवळा, हळद लागलेला किंवा तुटलेला तांदूळ पूजेत वापरू नये.
advertisement
4/7
केतकीचे फूल अर्पण करणे: ब्रह्मदेवाने एकदा महादेवाशी खोटे बोलले होते आणि त्यात केतकीच्या फुलाने साथ दिली होती. यामुळे रागावलेल्या शिवाने केतकीच्या फुलाला आपल्या पूजेतून बाद केले होते. म्हणून पूजेत केवळ बेलपत्र, धोत्रा किंवा पांढरी फुले वापरावीत.
advertisement
5/7
हळदी कुंकू: महादेवाची पूजा करताना चुकूनही हळदी कुंकू वापरू नये. शिव पूजेत हळदी कुंकू वर्ज्य मानले जाते. या ऐवजी तुम्ही चंदन किंवा विभूती याचा वापर करू शकता.
advertisement
6/7
तुळशीचे पान अर्पण करणे: भगवान विष्णूला तुळशी अत्यंत प्रिय असली, तरी महादेवाच्या पूजेत तुळशी अर्पण करणे वर्ज्य आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान शिवाने जालंधर नावाच्या असूराचा वध केला होता, जो तुळशीचा पती होता. त्यामुळे शिवाला तुळशी अर्पण करू नये. महादेवांना तुळशी अर्पण केल्यास संपूर्ण वर्ष अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
7/7
शंखाचा वापर करणे: महादेवाच्या पूजेत शंख वाजवणे किंवा शंखाने जलाभिषेक करणे टाळावे. भगवान शिवाने शंखचूड नावाच्या दैत्याचा वध केला होता आणि शंख हा त्या दैत्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे शिवपूजेत शंखाचा वापर निषिद्ध आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
महादेवाची पूजा करताना 99% लोक करतात 'या' चुका, पाचवी चूक तर टाळाच; अन्यथा वर्षभर भोगावे लागतील परिणाम!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल