समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत पोलीस कर्मचारीहे आपल्या कुटुंबासह मातोश्री नगरमध्ये राहत होते आणि एसआरपीएफ (राज्य राखीव पोलीस दल) मध्ये कार्यरत होते. आरोपी युवक आकाश मंडल हा गेल्या एक वर्षापासून त्यांच्या अल्पवयीन मुलीला त्रास देत होता आणि घराच्या परिसरात घुटमळत असे. यावरून मुलीच्या वडिलांनी यापूर्वीही त्याला ताकीद दिली होती. गुरुवारी दुपारी आरोपी पुन्हा घराच्या जवळ दिसला, ज्यावर वडिलांनी त्याला फटकारले आणि कानशिलात लगावली.
advertisement
उपचारादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
कानाखाली लावल्याचा राग मनात ठेवला आणि याच रागातून आरोपी आकाश मंडलने त्याचा भाऊ हर्षित मंडल आणि आई पुष्पा मंडल यांच्यासह रात्री साडेदहाच्या सुमारास घराबाहेर बोलावले आणि लोखंडी सळ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. मध्यस्थी करायला गेलेला सालाही जखमी दोन्ही जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
आरोपी घटनास्थळावरून फरार
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते, परंतु पोलिसांनी तत्परता दाखवत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपी पुष्पा मंडल ही देखील पोलीस विभागातच लिपिक पदावर कार्यरत आहे. एमआईडीसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
मातोश्रीनगर परिसरात तणावाचे वातावरण
दरम्यान, या घटनेनंतर मातोश्री नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे हत्येत रुपांतर झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
