Chicken Buying Tips : खरेदी करताना 'या' गोष्टी नक्की तपासा; मिळेल फ्रेश आणि चांगले चिकन
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
चिकन खायला खूप लोकांना वाढते. प्रोटीनचा समृद्ध स्रोत असलेले चिकन आपल्या आरोग्यसाठी फायदेशीर मानले जाते. हिवाळयात तर चिकन खाण्याचे प्रमाण खूप वाढते. तुम्हीही ताजे चिकन खाण्याचे शौकीन असेल तर चिकन खरेदी करताना काही बाबींची काळजी नक्की घ्या. या सोप्या टिप्स वापरून तुम्ही फ्रेश आणि चांगले चिकन विकत घेऊ शकता.
advertisement
1/5

चिकनचा वास घ्या : ताजे चिकन ओळखण्याची पहिली स्टेप म्हणजे वासाद्वारे तपासणे. जर कोंबडी एक ते दोन दिवसांची असेल तर त्यातून एक विचित्र वास येतो. आणि जर कोंबडी अर्धा तास किंवा तासापूर्वी कापली गेली असेल तर त्याला दुर्गंधी येत नाही. काहीवेळा चिकन शॉपच्या आतील दुर्गंधीची अचूक कल्पना येणे कठीण होते. म्हणून काही वेळ चिकन बाहेर घेऊन जा आणि ते दुर्गंधी येत आहे की नाही हे तपासा.
advertisement
2/5
रंग तपासा : ताजे चिकन नेहमी गुलाबी रंगाचे दिसते. चाकूने चिकन कापताना त्याचे मांस गुलाबी रंगाचे दिसेल. जर कोंबडीचा आतील भाग गुलाबी नसेल तर समजू शकतो की चिकन ताजे नाही.
advertisement
3/5
असे चिकन अजिबात घेऊ नका : तुम्हाला आजारांपासून दूर राहायचे असेल तर फ्रीजमध्ये ठेवलेले चिकन घेणे टाळा. असे चिकन खाल्ल्याने काहीवेळा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
advertisement
4/5
पॅकेज चिकन घेताना घ्या ही काळजी : पॅक केलेले चिकन खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. प्रथम कालबाह्यता तारीख म्हणजेच एक्स्पायरी डेट तपासा. दुसरे म्हणजे, पॅकेट उघडल्यानंतर त्याचा वास येणार नाही याची खात्री करा.
advertisement
5/5
काही वेळा अनेक दुकानदार एक्सपायरी डेट पुसून नवीन एक्सपायरी डेट पुन्हा लिहितात. सर्वच लोक असे करत नसले तरी काही लोक असे करू शकतात. त्यामुळे पॅकेज केलेले चिकन घेणे टाळणेच चांगले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chicken Buying Tips : खरेदी करताना 'या' गोष्टी नक्की तपासा; मिळेल फ्रेश आणि चांगले चिकन