Couple Travel Tips : जोडीदारासोबत फॉरेन ट्रीपला जायचा विचार करताय? तज्ज्ञांनी दिलेल्या महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Experts advice for couple foreign trips : आपल्या देशात अनेक ठिकाणं फिरल्यानंतर जोडप्यांच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो जेव्हा ते परदेशात फिरायला जाण्याचा विचार करतात. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत परदेशात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठीच.
advertisement
1/11

आपल्या आयुष्यात एक तरी फॉरेन ट्रिप करायची प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. पण केवळ इच्छा असून चालत नाही. त्यासाठी परफेक्ट प्लॅनिंग करणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जोडीदारासोबत फॉरेन ट्रिप करण्याचे फायदे आणि त्यादरम्यान कोणती काळजी घ्यावी याबद्दल महिती देत आहोत.
advertisement
2/11
जोडीदारासोबत दुसऱ्या देशात प्रवास करणे म्हणजे फक्त बकेट लिस्टमधून एखाद्या ठिकाण निवडून तिथे जाणे एवढंच नसतं. याने तुमच्या नात्याचा एक पूर्णपणे नवा पैलू समोर येतो. विशेषतः जेव्हा तुमचं नातं अजून एखाद्या बंधनात बांधलं गेलं नसेल आणि तुम्ही ते पुढे कसं जाईल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर फॉरेन ट्रिप तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
advertisement
3/11
या फॉरेन ट्रीपमध्ये तुम्हाला अनेक गोष्टींचा अंदाज येईल. जसे की, तुम्ही एकत्र कसे नियोजन करता, ताणतणाव कसा हाताळता, तडजोड करतही तुम्ही एकमेकांसोबत समाधानी राहू शकता का? अशा अनेक गोष्टी तुम्हाला कळतात.
advertisement
4/11
दिल्लीतील रिलेशनशिप काउन्सिलर रुची रुह यांनी इंडिया टुडेला माही देताना सांगितले की, फॉरेन ट्रिप केवळ केवळ नात्यातील एक पुढचा टप्पा नसतात. तर त्या तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर एकमेकांना अनुभवण्याची संधी देखील असतात.
advertisement
5/11
दुसऱ्या देशात एकत्र प्रवास केल्याने तुमच्या जोडीदाराचे असे पैलू तुम्हाला कळतात, जे तुम्हाला दैनंदिन जीवनात दिसणार नाहीत. चुकलेल्या फ्लाइट आणि माही नसलेल्या संस्कृतींपासून ते कडक वेळापत्रक आणि बजेट निर्णयांपर्यंत.. सगळ्या गोष्टी तुम्ही सोबत कशी हॅण्डल करता, याने तुमचे नटे आणखी घट्ट होते.
advertisement
6/11
रुची रुह यांनी फायद्यांबद्दल बोलताना जोडप्यांनी त्यांच्या पहिल्या फॉरेन ट्रीपला एकत्र जकताना कोणती काळजी घ्यावी, कोणकोणत्या गोष्टींचे योग्यप्रकारे नियोजन करावे हेदेखील सांगितले.
advertisement
7/11
सर्वात आधी त्यांनी सांगितले की, तुमचा जोडीदार तुमचा सहप्रवासी आहे. एकच व्यक्ती टूर मॅनेजर बनते आणि दुसरा फक्त त्याच्या मागे येतो. असे होता कामा नाये. ट्रिपचे नियोजन एकत्र करा.
advertisement
8/11
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हॉटेल किंवा वाहन काहीही बुक करण्यापूर्वी पैशांबद्दल स्पष्ट संभाषण करा, जेणेकरून नंतर कोणतेही अप्रिय क्षण किंवा गैरसमज होणार नाहीत.
advertisement
9/11
तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जरी जोडीने फिरायला गेलेले असाल, तरी दिवसातला काही वेळ एकटे फिरा. स्वतःसोबतही थोडा वेळ घालावा. सतत एकत्र राहताना एकमेकांना थोडा स्पेस द्यायलाही विसरू नका. याने तुमचं नातं आणखी घट्टच होईल.
advertisement
10/11
शेवटची पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ट्रिपला रोमँटिक बनवण्यासाठी खूप वेळ किंवा शक्ती वाया घालवू नका. म्हणजे तुमचे ध्येय इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी स्टोरी तयार करणे किंवा फोटो काढणे एवढेच नसावे. तर खरोखरच एकमेकांसोबत चांगला वेळ घालवा आणि आनंद लुटा.
advertisement
11/11
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Couple Travel Tips : जोडीदारासोबत फॉरेन ट्रीपला जायचा विचार करताय? तज्ज्ञांनी दिलेल्या महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा