TRENDING:

Avoid Fruits at Night: रात्री ‘ही’ फळं खात आहात? आत्ताच सावध व्हा, फायद्याऐवजी होईल नुकसान

Last Updated:
Avoid these Fruits at Night: फळं ही आरोग्यासाठी फायद्याची असतात. एकीकडे हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन आजारी पडण्याचा धोका असतो, अशा वेळी व्हिटॅमिन सी युक्त फळं खाण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का ही फळं योग्य वेळी खायला हवीत. जर तुम्ही चुकीच्या वेळी फळं खाल्लीत तर तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसानच होईल. जाणून घेऊयात रात्री कोणती फळं खाणं धोक्याचं ठरू शकतं.
advertisement
1/7
Avoid Fruits at Night: रात्री ‘ही’ फळं खाऊ नका, फायद्यांऐवजी होईल नुकसान
हिवाळ्यात थंडीमुळे पचनक्रिया ही आधीच मंदावलेली असते. अशावेळी रात्री हलकी आणि पचायला सोपी फळे खाणं शरीरासाठी फायद्याचं ठरू शकतं. सफरचंद, पपई किंवा बेरी अशा फळांमध्ये फायबर आणि पोषक तत्वं असतात, त्यामुळे ती रात्री खाणं शरीरासाठी आणि पचनसंस्थेच्या फायद्याची ठरू शकतात.
advertisement
2/7
संत्र्यांमध्ये सिट्रस ॲसिड आढळतं. ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होऊन पोटात जळजळ आणि ॲसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून दिवसा आपण जेव्हा जास्त सक्रिय असतो अशावेळी संत्री किंवा व्हिटॅमिन सी युक्त फळं खाणं फायद्याचं ठरू शकतं.
advertisement
3/7
काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं, ज्यामुळे शरीरात अतिरिक्त पाणी जमा होऊन तुम्हाला वारंवार लघवीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रात्री काकडी काकडी खाल्ल्यामुळे झोपेत बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे रात्री ऐवजी दिवसा काकडी खाणं केव्हाही फायद्याचं ठरतं.
advertisement
4/7
केळी ही पचनासाठी फायद्याची जरी असली तरीही केळी तुमच्या झोपेत अडथळा आणू शकतात. आपल्या शरीरातलं मेलाटोनिन हार्मोन हे झोपेसाठी फायद्याचं असतं. मात्र केळी खाल्ल्यामुळे मेलाटोनिन स्रवण्यात अडथळा येऊ शकतो. ज्यामुळे रात्री झोपताना त्रास होऊ शकतो.
advertisement
5/7
द्राक्षांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे रात्री द्राक्ष खाल्ल्याने रक्तातली साखर वाढून चयापचय क्रियेत अडथळा येऊ शकतो. ज्यामुळे पोटफुगी किंवा गॅसेसच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याचा विपरीत परिणाम झोपेवर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे रात्री द्राक्ष खाणं टाळाणं केव्हाही चांगलं.
advertisement
6/7
कलिंगड हे थंड प्रवृत्तीचं फळ मालं जातं. त्यामुळे उन्हाळ्यात उष्णतेचा बचाव करण्यापासून कलिंगड खाणं फायद्याचं ठरतं. मात्र हे थंडीच्या दिवसात किंवा रात्रीच्यावेळी कलिंगड खाण्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. रात्री कलिंगड खाल्ल्यामुळे गॅसेस आणि अपचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे केव्हाही रात्री कलिंगड खाणं टाळा.
advertisement
7/7
अनेकांना आंबा आवडतो. मात्र त्यात असलेल्या अतिरिक्त साखरेमुळे रात्री पचनक्रिया मंदावते. त्यामुळे गॅसेस, अपचन आणि ॲसिडिटीचा त्रास होण्याची भीती असते ज्यामुळे झोपेत अडथळा येऊ शकतो. त्यामुळे रात्री आंबा खाणं टाळावं. याशिवाय ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी पूर्ण आंबा खाण्याऐवजी आंब्याच्या फोडी खाल्ल्यास डायबिटीस नियंत्रित राहू शकेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Avoid Fruits at Night: रात्री ‘ही’ फळं खात आहात? आत्ताच सावध व्हा, फायद्याऐवजी होईल नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल