Nonveg : अंडी, मासे, चिकन आणि मटण...; पण तुम्ही काय खावं, नॉनव्हेज कोणता प्रकार तुमच्या आरोग्यासाठी चांगला
- Published by:Priya Lad
Last Updated:
Nonveg Benefits : कुणी म्हणतं अंडी चांगली, कुणी मासे, कुणी चिकन, तर कुणी मटण... पण तुमच्यासाठी काय योग्य हे तुमचं वय, आरोग्य, पचनशक्ती आणि जीवनशैली यावर अवलंबून आहे.
advertisement
1/7

नॉनव्हेज म्हटलं की त्यामध्ये अंडी, मासे, चिकन आणि मटण असे पर्याय आहेत. खरंतर हे चारही प्रकार पौष्टीक पण सगळ्यांसाठी एकसारखे योग्य नसतात. वय, आरोग्य, पचनशक्ती आणि जीवनशैली यावर काय खावं हे ठरतं.
advertisement
2/7
अंडी हा प्रोटिनचा सोर्स. त्यासोबत यामध्ये व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D आणि आवश्यक अमिनो अ‍ॅसिड्स असतात. अंडी मेंदूच्या कार्यासाठी स्नायूंच्या वाढीसाठी आणि शरीराच्या दुरुस्तीसाठी उपयुक्त आहेत. अंडी सहज पचतात. म्हणून विद्यार्थी, ऑफिसमध्ये बसून काम करणारे, तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी ती चांगली मानली जातात. वजन कमी करायचं असेल तरी अंडी उपयोगी ठरतात. मात्र ज्यांना कोलेस्टेरॉलचा त्रास आहे, त्यांनी पिवळा बलक मर्यादित प्रमाणात घ्यावा.
advertisement
3/7
माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स मोठ्या प्रमाणात असतात. जे हृदय, मेंदू आणि सांध्यांसाठी फार फायदेशीर आहेत. मासे सूज कमी करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. बीपी, मधुमेह, हृदयविकार किंवा सांधेदुखी असलेल्या लोकांसाठी मासे विशेष फायदेशीर मानले जातात. आठवड्यातून 1–2 वेळा शिजवलेले किंवा कमी तेलात फ्राय शिजवलेले मासे खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र फार तळलेले मासे टाळावेत.
advertisement
4/7
चिकन हे लीन प्रोटिन मानलं जातं. म्हणजेच त्यामध्ये प्रोटीन जास्त आणि फॅट कमी असतं. मसल्स वाढवण्यासाठी, वजन नियंत्रणासाठी आणि फिटनेससाठी चिकन उत्तम पर्याय आहे. जिम करणारे, वजन कमी करू इच्छिणारे किंवा मधुमेह असलेले लोक चिकन सहज खाऊ शकतात. चिकन सहज पचतं आणि रोजच्या आहारात समाविष्ट करता येते. मात्र फार मसालेदार किंवा तळलेलं चिकन आरोग्यासाठी चांगलं नसतं.
advertisement
5/7
मटण म्हणजे बकरीचं मांस, जे आयर्न, झिंक आणि व्हिटॅमिन B12 ने भरपूर असतं. अ‍ॅनिमिया, अशक्तपणा किंवा खूप शारीरिक मेहनत करणाऱ्या लोकांसाठी मटण उपयुक्त ठरू शकतं. मात्र मटण जड आणि फॅटी असल्यामुळे ते रोज खाणं योग्य नाही. बीपी, कोलेस्टेरॉल, युरिक अ‍ॅसिड किंवा पचनाचा त्रास असलेल्या लोकांनी मटण मर्यादित प्रमाणातच घ्यावं. साधारणपणे आठवड्यातून एकदा किंवा 10–15 दिवसांतून एकदा मटण खाणं पुरेसं असतं.
advertisement
6/7
अंडी, मासे, चिकन आणि मटण हे चारही पदार्थ चांगले आहेत, पण योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला खाल्ले तरच ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अंडी रोज, मासे किंवा चिकन आठवड्यातून दोन वेळा आणि कधीतरी मटण असा संतुलित आहार ठेवला तर शरीराला आवश्यक पोषण मिळतं.
advertisement
7/7
एकंदर काय तर एकाच पदार्थावर अवलंबून न राहता, विविधता आणि संतुलन हाच चांगल्या आरोग्याचा खरा मंत्र आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Nonveg : अंडी, मासे, चिकन आणि मटण...; पण तुम्ही काय खावं, नॉनव्हेज कोणता प्रकार तुमच्या आरोग्यासाठी चांगला