भाकरी पिझ्झा कधी खाल्लाय का? कुठं मिळतोय हा हटके पदार्थ पाहा PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
भाकरी पिझ्झा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. पण नेमका मिळतोय कुठे?
advertisement
1/6

प्रत्येकाला पिझ्झा खायला खूप आवडतो. कोणतही सेलेब्रेशन असो किंवा हलकी भूक कधीही पिझ्झा खातो येतो. सध्या <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईमधील</a> घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये भाकरी पिझ्झा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
2/6
भारतीय पद्धतीने तयार केलेल्या या पिझ्झाला विविध वयोगटाची मागणी देखील पाहायला मिळतेय. अल्पा कुबावत यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
3/6
घाटकोपर पूर्व येथे खाऊ गल्लीमध्ये रामानंदी म्हणून माझा स्टॉल आहे. कोरोना मध्ये घराची परिस्थिती बिघडली होती आणि आर्थिक समस्या जाणवत होती. यानंतर स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करावा असं नेहमी वाटत होतं. तसचं कोरोना मध्ये ब्रेड सुद्धा उपलब्ध होत नव्हते आणि विकत जरी घ्यायचं म्हटलं तरी मनात भीती होती.
advertisement
4/6
अशा वेळेसच घरात बाजरीच्या भाकरीवर, गव्हाच्या भाकरीवर पिझ्झा तयार केला. तो माझ्या घरात सर्वांना आवडत देखील होता. इथूनच स्वतःचं काहीतरी सुरू करावा म्हणून भाकरी पिझ्झाची सुरुवात केली, असं अल्पा कुबावत यांनी सांगितले.
advertisement
5/6
बाजारात मिळणारा पिझ्झा मैद्याचा असल्यामुळे तो शरीराच्या दृष्टीने हानिकारक असतो. मात्र भाकरी पिझ्झा पौष्टिक असून त्यामुळे आपल्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही.
advertisement
6/6
आता भाकरी पिझ्झा मध्ये दोन प्रकार असून येत्या काळात आणखी प्रकार सुरू करण्याचा विचार आहे. लहान मुलं, तरुणाई त्याचबरोबर सर्वात जास्त वयोवृद्ध माणसांना देखील हा पिझ्झा खावासा वाटतो. त्याची मागणी देखील सगळ्यात जास्त असल्याचं अल्पा कुबावत सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
भाकरी पिझ्झा कधी खाल्लाय का? कुठं मिळतोय हा हटके पदार्थ पाहा PHOTOS