Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या आधी घरी आणा महादेवाच्या 5 प्रिय गोष्टी, मोठी संकटे-विघ्न मार्गातून दूर होतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mahashivratri 2026: यंदा महाशिवरात्री 15 फेब्रुवारीला साजरी होणार आहे. हा दिवस शिवभक्तांसाठी खूप खास असतो. या दिवशी लोक उपवास करतात, दान-धर्म करतात आणि महादेवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी घरी आणतात. असं मानलं जातं की, महाशिवरात्रीला काही खास वस्तू घरी आणल्यामुळे जीवनात सुख-समृद्धी येते आणि येणारी संकटं दूर होतात. कोणत्या वस्तू आहेत, ज्या घरी आणणं शुभ ठरू शकतं. महाशिवरात्री दिवशी गडबड टाळण्यासाठी या वस्तू आधीच खरेदी करणे उत्तम.
advertisement
1/5

पारद शिवलिंग - महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही पारद शिवलिंग घरी आणू शकता. वास्तुशास्त्रानुसार, या दिवशी पारद शिवलिंग आणून त्याची पूजा केल्याने घरातील वास्तू दोष दूर होतात. तसंच, याची पूजा केल्यामुळे पितृ दोषातून सुद्धा सुटका मिळते.
advertisement
2/5
रुद्राक्ष - हिंदू धर्मात रुद्राक्षाला फार महत्त्व आहे. असं म्हणतात की रुद्राक्षाची उत्पत्ती शंकराच्या अश्रूंमधून झाली. त्यामुळे महाशिवरात्रीला रुद्राक्ष घरी आणल्याने चांगलं फळ मिळतं. रुद्राक्ष धारण केल्याने आजार आणि दोष दूर होतात आणि कुटुंबात आनंद येतो. रुद्राक्ष घरात असेल तर कामात येणारे अडथळे सुद्धा दूर व्हायला लागतात.
advertisement
3/5
बेलपत्राचं झाड - शंकराला बेलपत्र खूप आवडतं, म्हणून महाशिवरात्रीला बेलाचं एक छोटं रोप तुम्ही घरी आणू शकता. धार्मिक मान्यतेनुसार, बेलाच्या झाडात औषधी गुण असतात आणि हे झाड घरात किंवा अंगणात लावल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
advertisement
4/5
तांब्याचा कलश - महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही तांब्याचा नवीन कलश घरी आणू शकता. हा कलश आणून त्यात पाणी भरा आणि तो देवापाशी ठेवा. या तांब्याच्या कलशाने शिवलिंगावर जलाभिषेक केल्यास महादेवाची कृपा राहते.
advertisement
5/5
शिव परिवाराची मूर्ती किंवा फोटो - महाशिवरात्रीला शिव परिवाराची (शंकर, पार्वती, गणेश आणि कार्तिकेय) मूर्ती किंवा फोटो घरी आणणं खूप चांगलं असतं. यामुळे कुटुंबात एकमेकांबद्दल प्रेम वाढतं आणि ताळमेळ राहतो. शिव परिवाराची रोज पूजा केल्याने सर्व प्रकारचे दोष मिटून जातात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या आधी घरी आणा महादेवाच्या 5 प्रिय गोष्टी, मोठी संकटे-विघ्न मार्गातून दूर होतात