TRENDING:

Famous Food Pune : 51 वर्षांपासून जपलीये चवं, पुण्यातील प्रसिद्ध ब्रेड पॅटीस, एकदा खाल तर पुन्हा याल

Last Updated:
या ठिकाणी मागील 51 वर्षांपासून ब्रेड पॅटीस आणि पारंपरिक चवीने प्रसिद्ध आहे. त्यामुळे खवय्यांची या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते.
advertisement
1/7
51 वर्षांपासून जपलीये चवं, पुण्यातील प्रसिद्ध ब्रेड पॅटीस, एकदा खाल तर पुन्हा याल
पारंपरिक खाद्यसंस्कृतीसाठी पुणे शहर ओळखले जातं. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खायला मिळतील. या पदार्थांनी पुणेकरांच्या मनात आणि जिभेवर आपली खास जागा निर्माण केली आहे.
advertisement
2/7
पुण्यातील असेच ठिकाण म्हणजे कापडगंज पेठेतील सोनल स्नॅक्स होय. या ठिकाणी मागील 51 वर्षांपासून ब्रेड पॅटीस आणि पारंपरिक चवीने प्रसिद्ध आहे. त्यामुळे खवय्यांची या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते.
advertisement
3/7
1974 साली या व्यवसायाची सुरुवात हातगाडीवरून करण्यात आली होती. सूर्यवंशी कुटुंबाने सुरुवातीचे काही वर्षे रस्त्यावर हातगाडीवरून पदार्थ विक्री केली.
advertisement
4/7
त्यानंतर त्यांनी 1990 साली सोनल स्नॅक्स या नावाने दुकान सुरू केले. या दुकानाच्या पाठीमागे असलेला वाडा सुमारे 90 वर्षे जुना आहे. याच परिसरात हे दुकान कार्यरत आहे. सध्या या व्यवसायाची धुरा दुसऱ्या पिढीकडे आली असून, त्यांनी ही पारंपरिक चव तितक्याच प्रेमाने जपली आहे.
advertisement
5/7
सोनल स्नॅक्समध्ये मिळणारा ब्रेड पॅटीस हा इथला खास आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या पॅटीसमध्ये भरपूर बटाटा मसाला, खमंग चव आणि परिपूर्ण खुसखुशीतपणा हे गुणधर्म जपले जातात. पुणेकर या चवीने इतके मंत्रमुग्ध झाले आहेत की, वर्षानुवर्षे एकच ब्रेड पॅटीस खाण्यासाठी लोक इथे आवर्जून येतात.
advertisement
6/7
व्यवसाय प्रामाणिकपणे आजही चालू: गेली पाच दशके आम्ही आमचा व्यवसाय प्रामाणिकपणे चालवत आलो आहोत. आज जेव्हा आधुनिक स्नॅक्स आणि फास्ट फूडचा जमाना आहे, तेव्हा सोनल स्नॅक्ससारखे ठिकाण आपल्या जुन्या आठवणी जागवणारे आणि अस्सल चव जपणारे ठिकाण बनले आहे.
advertisement
7/7
हे दुकान केवळ खाद्यपदार्थांचे नव्हे तर पुण्याच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे एक जिवंत उदाहरण आहे, असं सुरेश सूर्यवंशी सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Famous Food Pune : 51 वर्षांपासून जपलीये चवं, पुण्यातील प्रसिद्ध ब्रेड पॅटीस, एकदा खाल तर पुन्हा याल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल