Chili Storage Tips : हिरव्या मिरच्या साठवण्याची ही पद्धत तुम्हाला माहितीये? 3 ते 4 आठवडे राहतात फ्रेश!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How To Store Green Chillies : बऱ्याचदा आपण एकदाच जास्त मिरच्या आणतो आणि काहीवेळा त्या खराब होतात. म्हणूनच त्या साठवण्याच्या योग्य पद्धती आपल्याला माहित असाव्या.
advertisement
1/7

मिरची हा भारतीय स्वयंपाक घरातील महत्त्वाचा भाग आहे. आपल्याकडे बहुतांश लोक तिखट अन्न खातात. बहुतेक लोकांना जेवणासोबत मिरची हवीच असते. हिरव्या मिरच्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अशावेळी मिरच्या योग्य प्रकारे साठवण्याच्या काही टिप्स तुमच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात.
advertisement
2/7
बऱ्याचदा आपण घरामध्ये एकदाच जास्त मिरच्या आणतो आणि काहीवेळा त्या वापरण्यापूर्वीच वाया जातात. म्हणूनच त्या साठवण्याच्या योग्य पद्धती आपल्याला माहित असाव्या. काही सोप्या पद्धती वापरून तुम्ही मिरच्या दीर्घकाळ टिकवू शकता.
advertisement
3/7
हिरव्या मिरच्या विकत घेताना त्या ताज्या पाहून घ्या. मिरच्या साठवून ठेवण्यापूर्वी त्या पूर्णपणे कोरड्या असाव्या. कारण ओल्या मिरच्या लवकर खराब होतात. बऱ्याचदा मिरची देठाजवळच खराब होऊ लागते. मिरच्या आणल्यानंतर आधी त्यांचे देठ काढून टाका. यामुळे त्या सडण्याची शक्यता 80% ने कमी होते.
advertisement
4/7
हिरव्या मिरच्या ताज्या ठेवण्यासाठी प्लास्टिकची पिशवी किंवा हवाबंद डब्याचा वापर करा. मिरच्या त्यामध्ये ठेवा आणि फ्रीजमध्ये जो भाजीपाला ठेवण्याचा डबा असतो, त्यात या मिरच्या ठेवा. इथे मिरच्या अधिक काळ ताज्या राहतात.
advertisement
5/7
हिरव्या मिरच्या साठवून ठेवण्याची आणखी एक पद्धत म्हणजे एखाद्या त्या 'पेपर टॉवेल' किंवा 'टिश्यू पेपर' मध्ये ठेवणे. यासाठी एक डबा घ्या आणि त्यामध्ये टिशू पेपर टाकून त्यामध्ये मिरच्या ठेवा. यामुळे मिरच्यांमध्ये थोडासाही ओलावा असेल तर तो टिश्यू पेपर शोषून घेईल आणि मिरच्या कोरड्या राहतील.
advertisement
6/7
हिरव्या मिरच्या साठवण्यासाठी हवाबंद डब्याचा म्हणजेच एअर टाईट कंटेनरच्या वापर करा. कारण मिरच्या सहजपणे ओलावा शोषून घेतात आणि जर डबा नीट बंद केला नाही, तर त्या लवकर सडण्याची शक्यता असते.
advertisement
7/7
फ्रीजमध्ये साठवल्यानंत हिरव्या मिरच्या अधूनमधून तपासून पाहा. एखादी मिरची खराब झाली असेल तर साडू लागली असेल तर ती लगेच काढून टाका. तुम्ही वेगवेगळ्या मिरच्या आणल्या असतील तर त्या वेगवेगळ्या डब्यांमध्ये साठवा. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chili Storage Tips : हिरव्या मिरच्या साठवण्याची ही पद्धत तुम्हाला माहितीये? 3 ते 4 आठवडे राहतात फ्रेश!