Red Ligth Therapy : फक्त चेहऱ्यासाठीच नाही, 'या' त्रासांवरही फायदेशीर असते रेड लाईट थेरपी! पाहा कशी करते काम
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
त्वचेच्या विविध समस्यांवर उपचार म्हणून रेड लाईट थेरपी हल्ली खूप वापरली जात आहे. पण तुम्हाला माहितीये का ही रेड लाईट थेरपी कशी काम करते..
advertisement
1/7

चेहऱ्यावरील सुरकुत्या, पिंपल्स, डाग आणि सूर्यप्रकाशामुळे होणारे नुकसान अशा त्वचेच्या विविध समस्यांवर उपचार म्हणून रेड लाईट थेरपी हल्ली खूप वापरली जात आहे. पण तुम्हाला माहितीये का ही रेड लाईट थेरपी कशी काम करते आणि तिचे आणखी काय फायदे आहेत? चला पाहूया.
advertisement
2/7
ही थेरपी लो-पॉवर लेझर थेरपी, कोल्ड लेझर थेरपी, सॉफ्ट लेझर थेरपी आणि नॉनथर्मल एलईडी लाईट थेरपी यांसारख्या इतर अनेक नावांनीही ओळखली जाते. जागरणमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या रेड लाईट थेरपीला फोटोबायोमॉड्युलेशन म्हणतात.
advertisement
3/7
या थेरपीमध्ये 600 ते 1100 नॅनोमीटर तरंगलांबीच्या लाल आणि जवळच्या-अवरक्त म्हणजेच नियर इन्फ्रारेड प्रकाशाचा वापर केला जातो. हा सूर्यप्रकाशाचाच एक भाग आहे. हा प्रकाश एलईडी पॅनेल्स, विशेष मास्क किंवा लेझर उपकरणांद्वारे शरीरावर लावला जातो.
advertisement
4/7
रेड लाईट थेरपी शरीरावर घेतल्यानंतर काय होतं हे जाणून घेऊया. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात. यांना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हटले जातं. जेव्हा रेड लाईट त्वचेत प्रवेश करतो, तेव्हा पेशी तो शोषून घेतात. यामुळे मायटोकॉन्ड्रिया जास्त सक्रिय होतात आणि शरीराच्या ऊर्जा निर्मिती प्रक्रियेला गती मिळते.
advertisement
5/7
क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, रेड लाईट थेरपी तुमच्या शरीरातील पेशींना उत्तेजित करून, त्यांची ऊर्जा वाढवते आणि लक्ष्यित भागाकडे रक्तप्रवाह वाढवते. यामुळे शरीराचे काही त्रास कमी होण्याची प्रक्रिया वेगवान होते. जसं आपलं शरीर रक्त गोठवून जखम बरी करतं. तसंच हे काम करतं.
advertisement
6/7
बफेलो विद्यापीठातील ओरल बायोलॉजी, बायोमेडिकल इंजिनियरिंग आणि सर्जरी विभागाचे प्राध्यापक प्रवीण आरानी यांच्या मते, हा उपचार सोपा आणि वेदनारहित आहे. रुग्ण सहसा आरामात बसतात किंवा झोपतात आणि 3 ते 15 मिनिटांसाठी त्यांच्यावर रेड लाईट टाकला जातो. रेड लाईट थेरपी केवळ जखमा भरण्यापुरती मर्यादित नाही. तिचे अनेक फायदे आहेत.
advertisement
7/7
रेडिएशनमुळे होणारी केसगळती रोखण्यासाठी आणि त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी रेड लाईट थेरपी प्रभावी आहे. नसांच्या वेदना आणि पायाच्या अल्सरवर उपचार करण्यासाठीही रेड लाईट थेरपी खूप उपयुक्त आहे. वाढत्या वयामुळे आणि ताणामुळे येणारं नैराश्य आणि दृष्टी कमी होणे यावरही रेड लाईट थेरपीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Red Ligth Therapy : फक्त चेहऱ्यासाठीच नाही, 'या' त्रासांवरही फायदेशीर असते रेड लाईट थेरपी! पाहा कशी करते काम