TRENDING:

सांगलीचा फेमस ब्रँड, या 3 वस्तू आता ऑनलाईन मिळणार, कुठं करायची खरेदी?

Last Updated:
Sangli News: उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळवून देता यावी, यासाठी हा नवीन उपक्रम महत्वाचा ठरणार आहे, असे सांगलीचे जिल्ह्याधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले.
advertisement
1/7
सांगलीचा फेमस ब्रँड, या 3 वस्तू आता ऑनलाईन मिळणार, कुठं करायची खरेदी?
हळद, बेदाणा आणि गूळ ही सांगलीच्या मातीतील खास उत्पादने आपले वैशिष्ट्ये टिकवून आहेत. या उत्पादनांना देशात आणि परदेशात देखील मोठी मागणी राहिली आहे. आता हीच उत्पादने ग्राहकांना एका क्लिकवर मिळणार आहेत.
advertisement
2/7
सध्याच्या काळात जवळपास सगळा कृषीमाल ऑनलाईन बाजारात उपलब्ध आहे. परंतु, सांगलीची हळद, बेदाणा आणि गूळ मात्र ऑनलाईन मिळत नव्हते. आता मात्र ही उत्पादने ऑनलाईन मध्यमातून ग्राहकांना उपलब्ध होतील.
advertisement
3/7
ऑनलाईन बाजारात सांगलीची ही खास कृषी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी 'फ्लिपकार्ट'ने या तीन शेतमालांची निवड केली आहे.
advertisement
4/7
खरेदीदार विक्रेता संमेलनानतर पुढील टप्प्यात जिल्ह्यातील कृषी विषयक उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी काम सुरू झाले आहे.
advertisement
5/7
प्राथमिक टप्प्यात सांगलीची हळद, बेदाणा आणि गूळ ही तीन उत्पादने ऑनलाईन विक्रीसाठी निवडली गेली आहेत. ते तिन्ही उत्पादनांच्या क्षेत्र भेटी करतील. जिल्हाधिकारी कार्यालयात फ्लिपकार्टचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी यांचे संमेलन हाईल.
advertisement
6/7
याबाबतच्या पूर्वनियोजन आढावा जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्री होण्यासाठी 'माझी सांगली, माझा अभिमान' या सांगली पॅटर्नअंतर्गत प्रयत्न करण्यात येत आहेत.
advertisement
7/7
या माध्यमातून जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण कृषी व अन्नप्रक्रिया केलेल्या उत्पादनांची देशभरात ओळख होऊन विक्री व्हावी, उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळवून देता यावी, यासाठी हा नवीन उपक्रम महत्वाचा ठरणार आहे, असे सांगलीचे जिल्ह्याधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
सांगलीचा फेमस ब्रँड, या 3 वस्तू आता ऑनलाईन मिळणार, कुठं करायची खरेदी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल