TRENDING:

Iran Israel Conflict: इराणसोबतच्या जमिनीवरील युद्धापूर्वी इस्रायलची मोठी कबुली, नेतन्याहू सरकारचं टेन्शन वाढलं, लष्करप्रमुखांनी काय सांगितलं?

Last Updated:

Israel Iran War: अमेरिकेसोबत इस्रायलचंही सैन्य इराणविरोधातील जमिनीवरील लढाईत सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. अशातच आता इस्रायलच्या लष्करप्रमुखांचं महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तेल अवीव: इराणविरुद्ध जमिनीवरील युद्धाची तयारी सुरू असतानाच इस्रायली लष्कराच्या अंतर्गत गोटातून एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. इस्रायल आणि अमेरिकेने लादलेल्या युद्धाविरोधात इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एकीकडे शस्त्रसंधी चर्चेचा प्रस्ताव अमेरिकेने इराण दिला असताना दुसरीकडे आता थेट जमिनीवर लष्कर उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेसोबत इस्रायलचंही सैन्य इराणविरोधातील जमिनीवरील लढाईत सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. अशातच आता इस्रायलच्या लष्करप्रमुखांचं महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानं इस्रायली सरकारचं टेन्शन वाढलं आहे.
इराणसोबतच्या जमिनीवरील युद्धापूर्वी इस्रायलची मोठी कबुली, नेतन्याहू सरकारचं टेन्शन वाढलं, लष्करप्रमुखांनी काय सांगितलं?
इराणसोबतच्या जमिनीवरील युद्धापूर्वी इस्रायलची मोठी कबुली, नेतन्याहू सरकारचं टेन्शन वाढलं, लष्करप्रमुखांनी काय सांगितलं?
advertisement

गेल्या ९०० दिवसांहून अधिक काळ अनेक आघाड्यांवर युद्ध लढणारी इस्त्रायली संरक्षण दलं (IDF) आता संकटात सापडली आहेत. इस्त्रायली लष्कराचे प्रमुख लेफ्टिनेंट जनरल एयाल जमीर यांनी सुरक्षा कॅबिनेटच्या बैठकीत अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. "इस्त्रायली सैन्य स्वतःच्याच दबावाखाली कोसळण्यापूर्वी मी धोक्याचे इशारे (Red Flags) देत आहे," अशा शब्दांत त्यांनी सरकारला सावध केले आहे.

advertisement

पाच आघाड्यांवर युद्ध आणि सैनिकांची कमतरता

गाझा, लेबनॉन, सीरिया, वेस्ट बँक आणि थेट इराण अशा पाच वेगवेगळ्या आघाड्यांवर इस्त्रायली सैनिक सध्या तैनात आहेत. युद्ध परिस्थितीच नव्हे तर शांततेच्या काळातही गाझा, लेबनॉन, सीरिया आणि वेस्ट बँकमध्ये इस्रायली सैन्याची आवश्यकता भासणार आहे.

सततच्या कारवायांमुळे राखीव सैनिकांवर (Reserve Soldiers) प्रचंड ताण आला असून, ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर तातडीने सैनिकांची संख्या वाढवली नाही, तर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी खिंडारं पडतील, असा इशारा लष्करप्रमुखांनी दिला आहे.

advertisement

राजकीय पेच आणि अनिवार्य भरतीचा वाद

इस्त्रायलमधील 'हरेदी' (अतिरूढ़िवादी ज्यू) समुदायाला लष्करी सेवेतून देण्यात आलेली सूट हा सध्या मोठ्या वादाचा विषय ठरला आहे. राजकीय दबावामुळे या समुदायासाठी अनिवार्य लष्करी भरतीचा कायदा अद्याप मंजूर झालेला नाही. हजारो तरुण सेवेतून बाहेर असल्याने लष्करावरचा भार कमी होत नाहीये. त्यातच सरकारने जानेवारी २०२७ पासून अनिवार्य सेवेचा कालावधी ३६ ऐवजी ३० महिने करण्याचा निर्णय घेतला आहे, जो लष्कराच्या मागणीच्या पूर्णपणे विरुद्ध असल्याचे सांगण्यात येत आहे.

advertisement

वेस्ट बँकमधील वाढता हिंसाचार

वेस्ट बँकमध्ये ज्यू राष्ट्रवादी हिंसाचार वाढल्याने तेथे अतिरिक्त बटालियन तैनात कराव्या लागत आहेत. नव्या चौक्यांना कायदेशीर दर्जा दिल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी आणखी सैनिकांची गरज भासणार आहे. एकाच वेळी इतक्या आघाड्या सांभाळताना लष्कर आता हतबल होताना दिसत आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चवीला एकदम टेस्टी, उन्हाळ्यात बनवा पारंपरिक कैरीचा ठेचा, संपूर्ण रेसिपीचा Video
सर्व पहा

तर, दुसरीकडे इराणविरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर हिजबुल्लाह, इराणकडून इस्रायली सैन्याला लक्ष्य केले जात आहे. आता अमेरिकेने जमिनीवर युद्ध सुरू केल्यास आणि इस्रायलनेही इराणवर कूच केल्यास इस्रायली सैन्यावर मोठा दबाव येण्याची भीती आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
Iran Israel Conflict: इराणसोबतच्या जमिनीवरील युद्धापूर्वी इस्रायलची मोठी कबुली, नेतन्याहू सरकारचं टेन्शन वाढलं, लष्करप्रमुखांनी काय सांगितलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल