TRENDING:

कारचा दरवाजा उघडला अन् मागून येणाऱ्या डिलिव्हरी बॉय टँकर खाली चिरडला, मुंबईत थरकाप उडवणारा अपघात

Last Updated:

मुंबई कांदिवली येथे न्यू लिंक रोडवर कार चालक आफताब आलमच्या निष्काळजीपणामुळे फूड डिलिव्हरी बॉय तुवानकुमार यादवचा भीषण अपघातात मृत्यू.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
काम मिळत नसल्याने कामाच्या शोधात आणि कुटुंबाला आधार म्हणून तो मुंबईत आला. डोळ्यात स्वप्न होती, दोन वेळच्या खाण्यासाठीही पैसे नव्हते. मग अचानक डिलिव्हरी बॉयचं काम मिळालं आणि नशीब पालटलं. हळूहळू सारं सुरळीत होतं म्हणेपर्यंत नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. कुटुंबापासून मैलो दूर आलेल्या तरुणाचा कार चालकाच्या बेशिस्तपणामुळे जीव गेल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली.
प्रातिनिधिक फोटो- AI
प्रातिनिधिक फोटो- AI
advertisement

कांदिवली पश्चिम इथे न्यू लिंक रोडवर बुधवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. कार चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने फूड डिलिव्हरी पोहोचवणाऱ्या तरुणाचा अपघात झाला. या अपघातात तुवानकुमार यादव 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. फूड डिलिव्हरी ॲपसाठी काम करत असताना तो पार्सल पोहोचवण्यासाठी निघाला होता, त्याच वेळी एका कार चालकाने उजव्या बाजूचा अंदाज न घेता अचानक कारचा दरवाजा उघडला. त्यामुळे कारच्या दरवाजाची धडक दुचाकीला बसली.

advertisement

नेमकं काय घडलं?

या भीषण अपघातात डिलिव्हरी बॉय दुचाकीवरुन खाली कोसळला. त्याच वेळी मागून येणाऱ्या टँकर त्याच्या डोक्यावरुन गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मूळचा बिहारचा असलेला तुवानकुमार यादव गेल्या १० वर्षांपासून मुंबईत राहत होता. गेल्या ५ वर्षांपासून तो एका प्रसिद्ध फूड डिलिव्हरी ॲपसाठी काम करत होता. बुधवारी संध्याकाळी तो आपली इलेक्ट्रिक दुचाकी घेऊन ऑर्डर पोहचवण्यासाठी निघाला होता. कांदिवली मेट्रो स्टेशनजवळ एका पेट्रोल पंपाबाहेर ही धक्कादायक घटना घडली.

advertisement

कुटुंबाचा आधार हरपला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चवीला एकदम टेस्टी, उन्हाळ्यात बनवा पारंपरिक कैरीचा ठेचा, संपूर्ण रेसिपीचा Video
सर्व पहा

अपघातानंतर तरुणाला तातडीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तुवानकुमारच्या भावाला फोनवरून ही माहिती मिळताच त्याने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी कार चालक आफताब आलम (रा. गोवंडी) आणि टँकर चालक अनंतराय शिवनायक (रा. वडाळा) यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. कार चालकाने आरशात न पाहता अचानक दरवाजा उघडल्यानेच हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
कारचा दरवाजा उघडला अन् मागून येणाऱ्या डिलिव्हरी बॉय टँकर खाली चिरडला, मुंबईत थरकाप उडवणारा अपघात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल