TRENDING:

'योग्य मुहूर्त बघून...', निक्की तांबोळीसोबत हिंदू पद्धतीने लग्न करणार अरबाझ पटेल? लग्नाच्या चर्चांवर पहिल्यांदाच सोडलं मौन

Last Updated:
Arbaz Patel Nikki Tamboli Marriage: नुकतंच अरबाझ पटेलने एका मुलाखतीत 'द ५०' या शोमधील गेम, भांडणं आणि निक्कीसोबत झालेले मतभेद यावर मोकळेपणाने आपली मतं मांडली आहेत. त्याचबरोबर त्याने निक्कीसोबत लग्नाच्या प्लानबद्दल मोठा खुलासा केला आहे.
advertisement
1/11
निक्की तांबोळीसोबत हिंदू पद्धतीने लग्न करणार अरबाझ पटेल? लग्नाच्या चर्चांवर पहिल्यांदाच सोडलं मौन
रिअॅलिटी शो केवळ जिंकण्या-हरण्याबद्दल मर्यादित राहिलेले नाहीत. अनेकदा अशा शोमध्ये आयुष्यभराच्या जोड्या जुळताना दिसतात.
advertisement
2/11
प्रिन्स नरुला-युविका चौधरी, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्रा या काही जोड्याही अशा शोमध्ये तयार झाल्या आणि त्यांनी शोनंतरही आपलं प्रेम अबाधित ठेवलं आहे.
advertisement
3/11
अशीच एक जोडी म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाझ पटेल. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात त्यांची भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
advertisement
4/11
त्यानंतर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहते खूश व्हायचे. बिग बॉस मराठीनंतर ही जोडी द ५० या शोमध्ये सहभागी झाली होती.
advertisement
5/11
इतकंच काय, तर अरबाझने निक्कीला या शोमधून सर्वांसमोर प्रपोजही केलं होतं. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या बातम्यांना उधाण आलं होतं.
advertisement
6/11
नुकतंच अरबाझ पटेलने एका मुलाखतीत द ५० या शोमधील गेम, भांडणं आणि निक्कीसोबत झालेले मतभेद यावर मोकळेपणाने आपली मतं मांडली आहेत. त्याचबरोबर त्याने निक्कीसोबत लग्नाच्या प्लानबद्दल मोठा खुलासा केला आहे.
advertisement
7/11
एका मुलाखतीत जेव्हा अरबाझला निक्कीसोबत लग्न कधी करणार, असे विचारण्यात आलं, तेव्हा अरबाझ म्हणाला, "आमच्या लग्नाबद्दल लोक इतका विचार करतात, हे पाहून खरंच खूप आनंद होतो. आम्ही लवकरच एक चांगला मुहूर्त पाहून लग्नाचा निर्णय घेऊ. पण सध्या आमचं पूर्ण लक्ष करिअरवर आणि पैसे कमवण्यावर आहे."
advertisement
8/11
अरबाझने स्पष्ट केलं की त्यांचं सध्याचं वय हे कष्ट करून पैसे आणि नाव कमावण्याचं आहे. आयुष्यात एकदा सेटल झाल्यावर आम्ही नक्कीच लग्न करू.
advertisement
9/11
निक्कीनेही एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की जोपर्यंत ते दोघे मिळून एखादा रिअॅलिटी शो जिंकत नाहीत, तोपर्यंत ते लग्नाचा विचार करणार नाहीत.
advertisement
10/11
द ५० शोमध्ये निक्कीने सांगितलं होतं की, तिच्या वडिलांचा निक्की आणि अरबाझच्या आंतरधर्मिय लग्नाला विरोध आहे. पण ते दोघेही त्यांच्या प्रेमावर ठाम आहेत. या शोमध्येही त्यांनी प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं, मात्र, नियम मोडल्यामुळे अरबाझला या शोमधून बाहेर काढण्यात आलं होतं.
advertisement
11/11
सध्या निक्की आणि अरबाझ मुंबईत लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहत असून सोशल मीडियावर सतत एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. अरबाज छत्रपती संभाजीनगरचा आहे तर निक्की मूळची डोंबिवलीची आहे. अशातच त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना भुरळ पाडत असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'योग्य मुहूर्त बघून...', निक्की तांबोळीसोबत हिंदू पद्धतीने लग्न करणार अरबाझ पटेल? लग्नाच्या चर्चांवर पहिल्यांदाच सोडलं मौन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल