TRENDING:

सोलापूरच्या शेतकऱ्याचा नादखुळा, 15 हजारांत बनवलं जुगाड, पेरणीचं टेन्शनच मिटलं

Last Updated:
हे पेरणी यंत्र मानव, ट्रॅक्टर तसेच पावर टिलर चलित आहे. यामुळे टोकन पद्धतीने शेतामध्ये बियांची अचूक पेरणी करता येते.
advertisement
1/5
सोलापूरच्या शेतकऱ्याचा नादखुळा, 15 हजारांत बनवलं जुगाड, पेरणीचं टेन्शनच मिटलं
शेती करताना सर्वात अवघड काम म्हणजे कोणत्या पिकांची पेरणी करणे होय. यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज लागते. त्यासोबतच वेळ पण वाया जातो. हेच काम सोपे होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात राहणाऱ्या रणजीत निंबाळकर यांनी पेरणी यंत्र तयार केले आहे. हे पेरणी यंत्र मानव, ट्रॅक्टर तसेच पावर टिलर चलित आहे. यामुळे टोकन पद्धतीने शेतामध्ये बियांची अचूक पेरणी करता येते.
advertisement
2/5
सध्याच्या घडीला पाहिले गेले तर शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये शेती अवजारांमध्येही मोठे बदल होत आहेत. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हीच गोष्ट लक्षात घेत रणजीत निंबाळकर यांनी हरिहर ऍग्रो रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना करून मानव, ट्रॅक्टर आणि पावर टिलर चलित पेरणी यंत्र विकसित केले आहे.
advertisement
3/5
या पेरणी यंत्रामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्हींची बचत होणार आहे. तसेच पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर चार इंचांपासून ते आवश्यकतेनुसार वाढवता किंवा कमी करता येते, ही या यंत्राची विशेष बाब आहे.
advertisement
4/5
सध्या बहुतांश पेरणी यंत्रांमध्ये काही प्रमाणात बियाणे शिल्लक ठेवावे लागते. रणजीत निंबाळकर यांनी तयार केलेल्या नव्या यंत्रामध्ये बियाणे शिल्लक राहत नाही आणि संपूर्ण बियाण्याची अचूक पेरणी होते. या पेरणी यंत्राद्वारे कांदा, मेथी, कोथिंबीर, मका, सोयाबीन, कापूस, गाजर, तूर, भुईमूग यांसारख्या विविध पिकांची पेरणी करता येते. या यंत्राला बनवण्यासाठी 15 हजार खर्च आला आहे. तर याची किंमत 25 हजार रुपये आहे.
advertisement
5/5
शेतकऱ्यांची वेळेची बचत या यंत्रामुळे होणार आहे. त्यामुळे हे पेरणी यंत्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच या यंत्राला शासकीय अनुदान देखील उपलब्ध असल्याची माहिती रणजीत निंबाळकर यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
सोलापूरच्या शेतकऱ्याचा नादखुळा, 15 हजारांत बनवलं जुगाड, पेरणीचं टेन्शनच मिटलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल