TRENDING:

Nashik News: सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी एसटीची 'सुपरफास्ट' सेवा, प्रत्येक १० मिनिटाला एक बस थेट गडावर!

Last Updated:

नाशिकमधील निमाणी परिसरात असणाऱ्या एसटी स्टँडवरून सप्तश्रृंग गडावर जाण्यासाठी भाविकांना विशेष बसेस सोडण्यात आल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंग गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नाशिकमधील निमाणी परिसरात असणाऱ्या एसटी स्टँडवरून विशेष बसेस सोडण्यात आल्या आहेत. ज्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सप्तश्रृंगी गडावर भाविकांना जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बसेसची सोय करण्यात आलेली आहे. सप्तश्रृंग गडावर निमाणीसह मालेगाव, मनमाड आणि सटाण्यासाठीही अतिरिक्त बसची सुविधा करण्यात आलेली आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.
News18
News18
advertisement

26 मार्च ते 3 एप्रिल या दिवसांमध्ये चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांना विशेष सवलत मिळणार आहे. भाविकांना सुलभ प्रवासासाठी एकूण 250 अतिरिक्त बसेसची सुविधा करण्यात आलेली आहे. प्रत्येकी दहा मिनिटाला सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी एक बस उपलब्ध असणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे. यात्रेकरूंना कोणतीही अडचणी येऊ नये, यासाठी प्रमुख ठिकाणी विशेष वाहतूक केंद्र उभारण्यात येणार आहेत. निमाणी बसस्थानकावरून आणि नांदुरी पायथ्याच्या इथून प्रवाशांना सप्तश्रृंग गडावर जाण्यासाठी विशेष गाडीची सोय असणार आहे.

advertisement

या दोन्हीही बसेस थेट सप्तश्रृंग गडावरील वाहनतळापर्यंत प्रवाशांना पोहोचवणार आहे. त्यानंतर पुढे प्रवासी थेट देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकणार आहेत. दरवर्षी फक्त दिंडोरी जिल्ह्यातूनच नाही तर, संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. ठरवण्यात आलेल्या ठिकाणापासून भाविकांसाठी अंतराप्रमाणे तिकिटाचे दर लागू करण्यात आलेले आहे. भाविकांना परवडणाऱ्या दरात सप्तश्रृंग गडावर देवीचे दर्शन करता येणार आहे. यात्रेच्या काळात वाढत्या गर्दीचा विचार करून एसटी प्रशासनाने ही विशेष व्यवस्था केलेली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चवीला एकदम टेस्टी, उन्हाळ्यात बनवा पारंपरिक कैरीचा ठेचा, संपूर्ण रेसिपीचा Video
सर्व पहा

नांदुरी ते सप्तश्रृंग गड या मार्गावर सर्वाधिक बसेस म्हणजेच 120 बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. निमाणी बस स्टँड ते सप्तश्रृंग गड या मार्गावर 65 बसेस, मालेगाव ते सप्तश्रृंग गड या मार्गावर 45 बसेस, मनमाड ते सप्तश्रृंग गड या मार्गावर 15 बसेस आणि सटाणा ते सप्तश्रृंग गड या मार्गावर 5 बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळालेला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी एसटीची 'सुपरफास्ट' सेवा, प्रत्येक १० मिनिटाला एक बस थेट गडावर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल