TRENDING:

Success Story : सेंद्रिय लागवड पद्धत ठरली फायद्याची, कांदा शेतीमधून कमवले 6 लाख!

Last Updated:
तरुण शेतकरी महेश राठोड यांनी सेंद्रिय पद्धतीने कांदा लागवड करत यशस्वी शेती केली आहे. दोन एकर क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या या पिकातून एका सीझनमध्ये तब्बल 5 ते 6 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
advertisement
1/7
सेंद्रिय लागवड पद्धत ठरली फायद्याची, कांदा शेतीमधून कमवले 6 लाख!
शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करताना पाहायला मिळतात. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील तरुण शेतकरी महेश राठोड यांनी सेंद्रिय पद्धतीने कांदा लागवड करत यशस्वी शेती केली आहे. दोन एकर क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या या पिकातून एका सीझनमध्ये तब्बल 5 ते 6 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
advertisement
2/7
कांदा लागवडीसाठी महेश राठोड यांनी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला. त्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून शेणखत, जीवामृत आणि इतर सेंद्रिय घटकांचा वापर केला.
advertisement
3/7
यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत झाली तसेच पिकाची गुणवत्ता सुधारली असल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादनातही समाधानकारक वाढ झाल्याचे दिसून आले. यासाठी त्यांना 25 हजार खर्च आला.
advertisement
4/7
शेतकरी महेश राठोड सांगतात की, सेंद्रिय शेतीमुळे सुरुवातीला काही अडचणी येतात, परंतु दीर्घकालीन फायदा नक्की मिळतो. खर्चात लक्षणीय घट झाल्याने निव्वळ नफा वाढला आहे.
advertisement
5/7
रासायनिक औषधांवर होणारा खर्च वाचल्यामुळे आर्थिक ताणही कमी झाला आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती हा भविष्यासाठी उत्तम पर्याय आहे.
advertisement
6/7
यावर्षी कांद्याला बाजारात चांगला दर मिळाल्याने महेश राठोड यांना अपेक्षेपेक्षा अधिक नफा झाला. त्यांच्या कांद्याची गुणवत्ता चांगली असल्यामुळे व्यापाऱ्यांकडूनही चांगली मागणी मिळाली. यामुळे त्यांच्या मेहनतीचे चीज झाले असून त्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
advertisement
7/7
दरम्यान, महेश राठोड यांनी इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. योग्य नियोजन आणि सेंद्रिय पद्धतीचा वापर केला, तर निश्चितच त्याचा फायदा होतो, असे ते सांगतात. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरात सेंद्रिय शेतीकडे वळण्याची प्रेरणा निर्माण होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : सेंद्रिय लागवड पद्धत ठरली फायद्याची, कांदा शेतीमधून कमवले 6 लाख!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल