TRENDING:

Baramati: पत्नीला म्हणाला, चल देवदर्शनाला जाऊ, रस्त्यातच वाद झाला, नवऱ्याने बायकोला जागेवर संपवली

Last Updated:

रस्त्यातील किरकोळ वादातून संतापलेल्या अक्षयने पत्नी शैलाला कारमधून ओढून बाहेर काढत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी, बारामती : कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यात पत्नीची अमानुष पद्धतीने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या घटनेने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. बारामती येथील अक्षय आणि शैला हे दाम्पत्य देवदर्शनासाठी गाणगापूरला गेले असताना हा भीषण प्रकार घडला.
नवऱ्याने बायकोची हत्या केली
नवऱ्याने बायकोची हत्या केली
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यातील किरकोळ वादातून संतापलेल्या अक्षयने पत्नी शैलाला कारमधून ओढून बाहेर काढत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीवरून मृतदेहावरून कार चालवली

यानंतर अक्षयने धारदार शस्त्राने शैलाचा गळा चिरला. इतक्यावर न थांबता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीवरून कार चालवत तिला चिरडले, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या अमानुष कृत्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

advertisement

पोलिसांकडून आरोपीला अटक, पूर्वनियोजित हत्येचा संशय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चवीला एकदम टेस्टी, उन्हाळ्यात बनवा पारंपरिक कैरीचा ठेचा, संपूर्ण रेसिपीचा Video
सर्व पहा

दरम्यान, पोलिसांनी आरोपी अक्षयला अटक केली असून, ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. देवदर्शनाच्या बहाण्याने पत्नीला कर्नाटकात आणून हा कट रचल्याची शक्यता पोलिस तपासत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Baramati: पत्नीला म्हणाला, चल देवदर्शनाला जाऊ, रस्त्यातच वाद झाला, नवऱ्याने बायकोला जागेवर संपवली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल