Guess Who: एका फिल्मसाठी 100Cr, स्वतःचं प्रायव्हेट जेट! 1300 कोटींचा मालक आहे सुपरस्टार, पण तरीही बायकोपेक्षा गरीब
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Guess Who: एका फिल्मसाठी १०० कोटी चार्ज करणारा अभिनेता १३०० कोटींचा मालक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या अभिनेत्याची पत्नी त्याच्यापेक्षाही श्रीमंत आहे.
advertisement
1/10

साऊथ इंडस्ट्रीने देशाला अनेक उत्तमोत्तम फिल्म्स दिल्या आहेत. या भागात फिल्म्सची तुफान क्रेज पाहायला मिळते त्याचबरोबर इथे फिल्म्समधील हिरोला देवाप्रमाणे पुजलं जातं. या इंडस्ट्रीतून अनेक मेगास्टार्सही जन्माला आले आहेत. यातीलच एक मेगास्टार म्हणजे सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा राम चरण.
advertisement
2/10
आज राम चरण त्याचा ४१ वा वाढदिवस साजरा करत असून याच निमित्ताने त्याचा आगामी चित्रपट 'पेड्डी' (Peddi) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये त्याचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून फॅन्स शॉक झाले आहेत.
advertisement
3/10
एका फिल्मसाठी १०० कोटी चार्ज करणारा राम चरण १३०० कोटींचा मालक आहे. वडिलांचा वारसा आणि स्वतःच्या मेहनतीवर इतकं मोठं साम्राज्य उभं केलेला राम अक्षरशः राजासारखं आयुष्य जगतो. पण तुम्हाला माहीत आहे का, १३०० कोटींचा मालक असलेल्या राम चरणची पत्नी उपासना त्याच्यापेक्षाही श्रीमंत आहे.
advertisement
4/10
राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला ही संपत्तीच्या बाबतीत आपल्या सुपरस्टार पतीलाही मागे टाकते. राम चरण जरी कोट्यवधींच्या घरात खेळत असला, तरी उपासनाचा बिझनेस आवाका त्याहून कित्येक पटीने मोठा आहे.
advertisement
5/10
उपासनाची ओळख केवळ राम चरणची पत्नी आणि चिरंजीवी यांची सून इतकीच मर्यादित नाही. तिची स्वतःची एक वेगळी ओळख असून ती ७७ हजार कोटींच्या साम्राज्याची मालकीण मानली जाते.
advertisement
6/10
देशातील सर्वात मोठ्या हॉस्पिटल चेनपैकी एक असलेल्या 'अपोलो हॉस्पिटल्स' चे संस्थापक डॉ. प्रताप सी. रेड्डी हे उपासनाचे आजोबा असून अपोलो हॉस्पिटल ग्रुपची एकूण व्हॅल्यू सध्या तब्बल ७७,००० कोटी रुपयांच्या वर आहे. अशातच उपासना या साम्राज्याची मुख्य वारसदार मानली जाते.
advertisement
7/10
इतकंच नाही, तर उपासना 'URLife' या वेलनेस प्लॅटफॉर्मची संस्थापक आहे आणि 'अपोलो हॉस्पिटल्स' मध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) ची व्हाइस चेअरपर्सन म्हणून कामकाज सांभाळते.
advertisement
8/10
राम चरण आणि पत्नी उपासना यांच्या संपत्तीची तुलना केली असता, त्यांची वैयक्तिक संपत्ती अनुक्रमे सुमारे १३७० कोटी रुपये आणि ११३० कोटी रुपये इतकी आहे. राम चरणच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत चित्रपट, जाहिराती आणि कोनिडेला प्रोडक्शन हाऊस आहे, तर उपासनाच्या उत्पन्नाचा स्त्रोत अपोलो ग्रुप, स्वतःचा बिझनेस, फॅमिली इन्हेरिटन्स आहेत.
advertisement
9/10
तुलना केली असता राम चरणची संपत्ती उपासनापेक्षा जास्त असली, तरीही उपासनाच्या नावावर असलेला बिझनेस लेगसी आणि कौटुंबिक संपत्तीचा आकडा राम चरणपेक्षा खूप पटीने जास्त आहे.
advertisement
10/10
हे जोडपं हैदराबादच्या पॉश जुबली हिल्स भागात एका बंगल्यात राहतं, ज्याची किंमत ३० ते ४० कोटी रुपये आहे. राम चरणकडे स्वतःचं प्रायव्हेट जेट असून तो रोल्स रॉयस फँटम, एस्टन मार्टिन आणि मर्सिडीज मेबॅक सारख्या आलिशान गाड्यांचा शौकीन आहे. उपासना देखील या लक्झरी लाइफचा भाग आहे, पण तिचं जास्त लक्ष समाजसेवा आणि आरोग्य क्षेत्रातील बदलांकडे असतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: एका फिल्मसाठी 100Cr, स्वतःचं प्रायव्हेट जेट! 1300 कोटींचा मालक आहे सुपरस्टार, पण तरीही बायकोपेक्षा गरीब