TRENDING:

FASTag अ‍ॅन्युअल पासचा भाव 1 एप्रिलपासून वाढणार! पाहा 3 हजार रुपयांचा पास आता कितीला मिळणार

Last Updated:
FASTag Annual Pass Price Hike : येत्या एक एप्रिलपासून अनेक महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत. नवं आर्थिक वर्ष बदलत असल्याने या दिवसांपासून महत्त्वाच्या आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहोत. यात फास्टॅगच्या नियमांतही बदल होणारेय.
advertisement
1/7
FASTag अ‍ॅन्युअल पासचा भाव 1 एप्रिलपासून वाढणार! पाहा 3 हजार रुपयांचा पास आता कितीला मिळणार
नवी दिल्ली : येत्या 1 एप्रिलपासून फास्टॅगचे भाव वाढणार आहे. जे लोक नॅशनल हायवेचा जास्त वापर करतात, यासोबतच जे अॅन्युअल पासचा जास्त वापर करतात. आता त्यांना जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. जे लोक टोल टॅक्सवर बचत करण्यासाठी फास्टॅगचा अॅन्युअल पास वापरतात त्यांच्यावर या बदलाचा परिणाम होईल.
advertisement
2/7
सध्या फास्टॅग अॅन्युअल पास 3000 रुपयांना उपलब्ध आहे. पण आता त्याच्या किंमतीत वाढ होणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून या फास्टॅगची किंमत वाढून 3,075 रुपये होईल. म्हणजेच आता या वार्षिक पासवर 75 रुपयांची वाढ करण्यात आलीये. ही नवी वाढ आर्थिक वर्ष 2026-27 च्या सुरुवातीपासून देशभरात लागू होतील.
advertisement
3/7
15 ऑगस्ट 2025 रोजी हे पास लॉन्च करण्यात आले. यानंतर ते खाजगी वाहन वापरणाऱ्यांमध्ये खुपच लोकप्रिय झालेय. सध्या जवळपास 56 लाख वाहन हे राष्ट्रीय राजमार्ग आणि एक्सप्रेसवेवर कोणत्याही अडथळ्याशिवाय या पासच्या माध्यमातून टोल भरत आहेत.
advertisement
4/7
असे वाचतील पैसे : फास्टॅगच्या किंमती या येत्या 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. यामुळे अजनही वाहन चालकांकडे पैसे वाचवण्याची संधी आहे. तुमचं रिन्युअल जवळ आलं असेल किंवा मग तुम्ही हा पास खरेदी करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर 31 मार्चच्या रात्री 11.59 पूर्वी तुम्ही तो जुन्या किंमतीत खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात.
advertisement
5/7
घर बसल्या खरेदी करू शकता फास्टॅग पास : तुम्ही घरबसल्या एनएचएआयच्या अधिकृत वेबसाइट किंवा राजमार्ग अॅपच्या माध्यमातून फास्टॅग अॅन्युअल पास खरेदी करु शकता. एनएचएआय वेबसाइटवरुन हा पास कसा खरेदी करता येईल पाहूया.
advertisement
6/7
सर्वात आधी NHAI च्या वेबसाइटवर जा आणि आपल्या रजिस्टर्ड क्रेडेंशियल्सने लॉग इन करा. मेन्यूमध्ये ‘FASTag Annual Pass’ निवडा. आपल्या वाहन आणि FASTag ची माहिती नोंदवा. तुम्ही पात्र झाला आहात हे स्पष्ट झाल्यावर ऑनलाइन पैसे भरा.
advertisement
7/7
राजमार्ग अॅपवरुन फास्टॅग पास कसं काढायचं : आपल्या स्मार्टफोनवर Rajmarg Yatra अॅप डाउनलोड करा आणि मोबाईल नंबरने लॉग इन करा. अॅपमध्ये आपला Rajmarg Yatra लिंक करा.अॅन्युअल पास सेक्शनमध्ये जाऊन आपलं वाहन निवडा आणि ठरलेली रक्कम भरा. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुमचं अॅन्युअल पास वाहनाशी संबंधीत FASTag वर लगेच अॅक्टिव्ह केला जाईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
FASTag अ‍ॅन्युअल पासचा भाव 1 एप्रिलपासून वाढणार! पाहा 3 हजार रुपयांचा पास आता कितीला मिळणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल