Pune Rain: शिमला नव्हे हे तर आपलं पुणे! आयटी नगरीत बर्फाची चादर? PHOTOS व्हायरल, Fact Check
- Published by:Sachin S
- Reported by:Govind Wakde
Last Updated:
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला. पण, अशातच पुण्यामध्ये दुपारी अचानक जोरदार पाऊस झाला. नुसता पाऊस झाला नाहीतर गारपीट सुद्धा झाली.
advertisement
1/7

आता कुठे उन्हाळा सुरू झाला, उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला. पण, अशातच पुण्यामध्ये दुपारी अचानक जोरदार पाऊस झाला. नुसता पाऊस झाला नाहीतर गारपीट सुद्धा झाली. आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गारपीट झाली की हिंजवडी आहे की शिमला, असा प्रश्न उपस्थित झाला.
advertisement
2/7
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाने हजेरी लावली. पुण्यातील औंध, बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे या भागाला पावसानं झोडपलं. पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी सुद्धा साचलं होतं.
advertisement
3/7
अशातच आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरामध्ये जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळे मोकळ्या मैदानात गारांचा पांढरा शुभ्र खच पडला होता.
advertisement
4/7
गारपिट सुरू असताना काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावरून खाली पार्किंगमध्ये गारांचा खच पडला आहे. गारपीट इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की पांढरी चादर पसरली होती.
advertisement
5/7
आयटी नगरी हिंजवडी परिसरामध्ये गारपिटीचा पाऊस झाल्यामुळे सर्वत्र व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची पुष्टी न्यूज१८ मराठीने केली नाही. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
6/7
तर पुण्यातील औंध, बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे आणि पाषाण परिसरातही तुफान पाऊस झाला. थोडाश्या पावसामध्ये रस्त्यावर पाणी साचलं. त्यामुळे लोकांची एकच तारांबळ उडाली होती.
advertisement
7/7
सखल भागामध्ये पाणी साचलं होतं. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यभरात पाऊस कोसळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Rain: शिमला नव्हे हे तर आपलं पुणे! आयटी नगरीत बर्फाची चादर? PHOTOS व्हायरल, Fact Check