TRENDING:

Pune Rain: रणरणत्या उन्हात पुण्यात पावसाळा, कुठे साचलं पाणी तर कुठे गारपीट? पण असं का घडलं?

Last Updated:
काही ठिकाणी गारपीटही झाल्याचे पाहायला मिळाले. या बदललेल्या हवामानामुळे नागरिकांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस अशाच स्वरूपाच्या सरी आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
advertisement
1/7
रणरणत्या उन्हात पुण्यात पावसाळा, कुठे साचलं पाणी तर कुठे गारपीट? पण असं का घडलं?
ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत अचानक झालेल्या पावसामुळे पुणे शहरात वातावरणात बदल निर्माण झाला आहे. सकाळी ऊन असतानाच दुपारी आकाशात ढग दाटून आले आणि अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडला. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं.
advertisement
2/7
बाणेर, मांजरी, चंदननगर, खराडी भागात गारपीटही झाल्याचे पाहायला मिळाले. या बदललेल्या हवामानामुळे नागरिकांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस अशाच स्वरूपाच्या सरी आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
advertisement
3/7
हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितलं की, उन्हाळ्यात जमिनीचे तापमान खूप वाढते. दिवसभर तीव्र उन्हामुळे जमिनीवरील हवा गरम होऊन ती वेगाने वर चढते. वरच्या थरात आधीच आर्द्रता (हवेतील बाष्पाचे प्रमाण) जास्त असल्यास या गरम हवेचे ढगांमध्ये रूपांतर होते. अशा परिस्थितीत मोठ्या उंचीवर तयार होणारे क्युम्युलोनिंबस प्रकारचे ढग वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि कधीकधी गारपीट घडवून आणतात.
advertisement
4/7
गारपीट नेमकी कशी होते? याबाबत हवामान शास्त्रज्ञ सांगतात की, ढगांच्या वरच्या थरात तापमान खूप कमी असते. वर चढणाऱ्या ओलसर हवेबरोबर पाण्याचे सूक्ष्म थेंब गोठतात आणि बर्फाचे छोटे कण तयार होतात. ढगांमधील जोरदार वाऱ्यामुळे हे कण वारंवार वर-खाली फिरतात.
advertisement
5/7
प्रत्येक फेरीत त्यांच्यावर पाण्याचे आणखी थर जमा होऊन ते मोठे होत जातात. शेवटी हे बर्फाचे कण जड झाल्यावर गारांच्या रूपाने जमिनीवर पडतात. त्यामुळे अचानक गारपीट झाल्याचे दिसते.
advertisement
6/7
आज झालेल्या पावसानंतर शहरातील तापमानात किंचित घट झाली असून वातावरण आल्हाददायक झाले आहे. तरी शेतकऱ्यांसाठी गारपीट काही प्रमाणात नुकसानकारक ठरू शकते, अशीही चिंता व्यक्त केली जात आहे.
advertisement
7/7
दरम्यान, हवामान खात्याने नागरिकांना पुढील काही दिवस दुपारनंतर ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. विशेषतः विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर उभे राहू नये, तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Rain: रणरणत्या उन्हात पुण्यात पावसाळा, कुठे साचलं पाणी तर कुठे गारपीट? पण असं का घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल