IPL 2026 : तब्बल 18 वर्षानंतर धोनी पर्वाचा 'द एन्ड', स्वत: CSK ने केली घोषणा, पोस्ट चर्चेत!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
MS Dhoni Era Ends in IPL 2026 : गेली 18 वर्ष चेन्नई सुपर किंग्जसाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने आता थांबायचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
advertisement
1/7

आयपीएलच्या 19 व्या हंगामाला आता सुरूवात झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात तिसरा सामना खेळला जाईल. अशातच आता चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
2/7
कॅप्टन ऋतुराज गायकवाडच्या रुपात चेन्नईला नवा महोरक्या मिळाला. तर संजू सॅमसनच्या रुपात चांगला बॅकअप पर्याय मिळाला आहे. अशातच आता चेन्नईचा थाला निवृत्त होण्याच्या मार्गावर पोहोचला आहे.
advertisement
3/7
गेली 18 वर्ष चेन्नई सुपर किंग्जसाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने आता थांबायचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
advertisement
4/7
चेन्नईने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये धोनीचा फोटो गायब आहे. तसेच नव्या युगाची सुरूवात असं म्हणत चेन्नईने संजू, ऋतुराज, शिवम दुबे आणि ब्रेविस यांचे फोटो शेअर केले आहेत.
advertisement
5/7
मीडिया रिपोर्टनुसार, महेंद्रसिंग धोनी पहिले 14 दिवस मॅच खेळणार नाही, अशी माहिती समोर आली होती. पण नंतर धोनीने एप्रिलच्या अखेरपर्यंत मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरणार नाही, अशी माहिती देखील समोर आली आहे.
advertisement
6/7
एवढंच नाही तर महेंद्रसिंग धोनी चेन्नईच्या टीमसोबत देखील प्रवास करत नाहीये. तो राजस्थानविरुद्धच्या मॅचसाठी गुवाहाटीला देखील गेला नसल्याची माहिती चेन्नईतून समोर आली होती.
advertisement
7/7
दरम्यान, धोनी आता हळूहळू चेन्नई सुपर किंग्जमधून काढता पाय घेतोय, हे स्पष्ट होताना दिसत आहे. त्यामुळे थालाच्या फॅन्सला मोठा धक्का बसला असेल एवढं मात्र निश्चित...
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : तब्बल 18 वर्षानंतर धोनी पर्वाचा 'द एन्ड', स्वत: CSK ने केली घोषणा, पोस्ट चर्चेत!