TRENDING:

Iran US Conflict: अमेरिकन सैन्याला मरायला एकटं सोडलं, इस्रायलनं अमेरिकेच्या पाठीत खंजीर खुपसला! इराण युद्धात नवा ट्विस्ट

Last Updated:

Iran War: इराणविरोधात सुरू होणाऱ्या जमिनीवरील लष्करी कारवाईतून इस्रायलने माघार घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणने याआधीच गंभीर परिणामाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता इस्रायलने माघार घेतली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तेल अवीव: इस्रायल-अमेरिकेने इराणविरोधात युद्ध पुकारून एक महिना झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याला इराणकडून जोरदार प्रतिकार सुरू आहे. इराणच्या प्रत्यु्त्तरानं दोन्ही देशांची डोकेदुखी वाढली आहे. तर, दुसरीकडे इराणने आखाती देशांमध्ये असणाऱ्या अमेरिकन लष्करी तळांवर थेट हल्ले केल्यानं अमेरिकेच्या लष्करी कारवाईला धक्का बसला आहे. अशातच आता अमेरिकेची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. इराणविरोधात सुरू होणाऱ्या जमिनीवरील लष्करी कारवाईतून इस्रायलने माघार घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणने याआधीच गंभीर परिणामाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता इस्रायलने माघार घेतली आहे.
अमेरिकन सैन्याला मरायला एकटं सोडलं, इस्रायलनं अमेरिकेच्या पाठीत खंजीर खुपसला! इराण युद्धात नवा ट्विस्ट
अमेरिकन सैन्याला मरायला एकटं सोडलं, इस्रायलनं अमेरिकेच्या पाठीत खंजीर खुपसला! इराण युद्धात नवा ट्विस्ट
advertisement

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर अमेरिकेने इराणविरुद्ध जमिनीवर लष्करी कारवाई (Ground Operation) करण्याचा निर्णय घेतला आहे. तर इस्त्रायली सैन्य त्यात थेट सहभाग घेणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. इस्त्रायलमधील प्रतिष्ठित 'चॅनल १२' च्या वृत्तानुसार, नेतन्याहू सरकार आपल्या सैन्याला इराणच्या भूमीवर उतरवण्यास इच्छुक नाही.

advertisement

अमेरिकेसाठी 'एकला चलो रे'ची स्थिती

वृत्तानुसार, पेंटागॉनने इराणच्या विरोधात संभाव्य जमिनीवरील हल्ल्याच्या पर्यायांवर काम सुरू केले असून पश्चिम आशियात युद्धनौका, लढाऊ विमाने आणि सैनिकांची संख्या वाढवली आहे. मात्र, या मोहिमेत अमेरिकेला मित्रराष्ट्र असलेल्या इस्त्रायलची साथ मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. इस्त्रायल केवळ तांत्रिक मदत किंवा गुप्तचर माहिती शेअर करण्यापुरता मर्यादित राहू शकतो, परंतु त्यांचे 'बूट्स ऑन ग्राउंड' (प्रत्यक्ष सैन्य) असणार नाहीत.

advertisement

इस्त्रायलची सावध भूमिका का?

रणनीतिक तज्ज्ञांच्या मते, इस्त्रायल आधीच अनेक आघाड्यांवर आव्हानांचा सामना करत आहे. इराणसारख्या मोठ्या आणि लष्करीदृष्ट्या सक्षम देशासोबत थेट जमिनीवर युद्ध पुकारल्यास प्रादेशिक तणाव हाताबाहेर जाऊ शकतो. तसेच, अशा युद्धात होणारी जीवितहानी आणि आर्थिक फटका टाळण्यासाठी इस्त्रायलने 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतल्याचे समजते.

advertisement

अमेरिकेपुढील पेच

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मुंबईतील असं ठिकाण, जिथं एकाच वेळी होते 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन, तुम्ही दिलीये कधी भेट? Video
सर्व पहा

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अद्याप कोणत्याही मोठ्या जमिनीवरील युद्धाला अधिकृत मंजुरी दिलेली नाही. मात्र, त्यांनी सैन्य पाठवण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने एकट्याने इराणवर हल्ला केल्यास ते लष्करी आणि राजकीयदृष्ट्या मोठ्या जोखमीचे ठरू शकतात. इराणच्या दुर्गम भूभागात आणि मजबूत संरक्षण दलांसमोर कोणत्याही मोठ्या सहकाऱ्याशिवाय लढणे अमेरिकेसाठी आव्हानात्मक ठरू शकते. इराणविरोधात जमिनीवर युद्ध लढणं सोपं नसल्याचे संक्षण तज्ज्ञांनी म्हटले.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
Iran US Conflict: अमेरिकन सैन्याला मरायला एकटं सोडलं, इस्रायलनं अमेरिकेच्या पाठीत खंजीर खुपसला! इराण युद्धात नवा ट्विस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल