तिशीत लग्न, वयाच्या चाळीशीत दुसऱ्यांदा आई झाली सोनम कपूर; मुलगा की मुलगी! अहुजांच्या घरी कोण आलं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sonam Kapoor Second Baby : अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई झाली. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली.
advertisement
1/10

बॉलिवूडमधील स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूरनं गुड न्यूज दिली आहे. सोनम तिच्या दुसर्‍या प्रेग्नंसीमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. तिचे फोटोशूट खूप व्हायरल झाले होते.
advertisement
2/10
सोनम कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. वयाच्या चाळीसाव्या वर्षी सोनमने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. या गोड बातमीमुळे कपूर आणि अहुजा कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
advertisement
3/10
सोनम आणि तिचा पती आनंद अहुजा यांनी 2018 मध्ये लग्न केलं. त्यानंतर दोघांनी आपल्या वैवाहिक आयुष्याचा प्रत्येक क्षण सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला.
advertisement
4/10
2022 मध्ये सोनमने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. वायू असं सोनमच्या मुलाचं नाव आहे. मुलासोबतचे फोटो देखील ती शेअर करत असते.
advertisement
5/10
सोनम कपूरने आपल्या प्रेग्नन्सीदरम्यानही फॅशन आणि स्टाईल कायम ठेवली होती. तिचे मॅटरनिटी फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
advertisement
6/10
29 मार्च रोजी सोनम कपूर दुसरी डिलिव्हरी झाली. तिला गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर सोनमने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांबरोबर गुड न्यूज शेअर केली आहे.
advertisement
7/10
सोनमने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "खूप कृतज्ञता आणि प्रेमाने भरलेल्या मनाने आम्ही ही आनंदाची बातमी शेअर करत आहोत की, 29 मार्च 2026 रोजी आमच्या घरी एका मुलाचा जन्म झाला आहे. आमचं कुटुंब आता आणखी मोठं झालं आहे. त्याच्या आगमनाने आमची मनंही सर्वात सुंदर पद्धतीने अधिक मोठी झाली आहेत."
advertisement
8/10
"वायु आपल्या लहान भावाचं स्वागत करताना खूप आनंदी आहे आणि या अमूल्य नव्या जीवासाठी आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो, ज्याने आमचं घर आनंद आणि प्रेमाने भरून टाकलं आहे."
advertisement
9/10
"सोनम आणि आनंद आता चार जणांच्या कुटुंबाच्या रूपात त्यांच्या आयुष्यातील या सुंदर नव्या प्रवासाची सुरुवात करत आहेत आणि त्यासाठी ते खूप कृतज्ञ आहेत."
advertisement
10/10
सोनम कपूरने 2015 साली प्रेम रतन धन पायो सिनेमातून इंडस्ट्रीत डेब्यू केला. त्यानंतरही तिनं काही सिनेमात काम केलं पण तिच्या अभिनयाची छाप पाडू शकली नाही. त्यानंतर तिने थेट लग्न केलं आणि ती संसारत रमली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तिशीत लग्न, वयाच्या चाळीशीत दुसऱ्यांदा आई झाली सोनम कपूर; मुलगा की मुलगी! अहुजांच्या घरी कोण आलं?