इंडक्शन कूकटॉप किती वीज वापरते? एक तासाचा खर्च जाणून व्हाल हैराण
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Induction Stove Electricity Usage : सध्या देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरच्या कमतरतेच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान अनेक लोक इंडक्शनचा वापर करता. पण ते दर तासाला किती वीज वापरते माहितीये? चला जाणून घेऊया...
advertisement
1/9

Induction Cooktop Power Consumption: भारतात सध्या इंडक्शन कूकटॉपची मागणी वेगाने वाढतेय. याचं कारणही तसंच आहे. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा असल्याच्या चर्चा आहेत. आता 25 दिवसांनी बुक करता येणारा गॅस 35 दिवसांनी बुक करता येणार आहे. ज्यामुळे गॅसचा वापर हा काळजीपूर्वी करणं गरजेचं आहे. यासाठीच लोक इंडक्शन कूकटॉप खरेदी करत आहेत.
advertisement
2/9
हे खरेदी करत असताना ते किती वीज वापरते हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अनेक लोकांना वाटतं की, याला जास्त वीज लागते. पण याचा खर्च हा तुमच्या वापरावर अवलंबून असतो. योग्य माहिती असेल तर तुम्ही वीज बिल कंट्रोलमध्ये ठेवू शकता. चला जाणून घेऊया इंडक्शन कूकटॉप दरतासाला किती वीजेचा वापर करते. यासोबतच तुम्ही इंडक्शन वापरताना वीजेचा वापर कसा कमी करू शकता.
advertisement
3/9
इंडक्शन कूकटॉप कसं काम करतं? : आपण आधी जाणून घेऊया की, इंडक्शन कूकटॉप हे गॅस शेगडीपेक्षा कसं वेगळं काम करतं. तर यामध्ये वीजेच्या माध्यमातून मॅग्नेटिक फील्ड तयार होते. जी भांडं गरण करण्यात थेट मदत करते. म्हणजेच हीट थेट जेवण शिजवण्यासाठी वापरली जाते. तसंच ऊर्जेची दुरुपयोगच होत नाही. याच कारणामुळे हे इंडक्शन कुकटॉप अत्यंत एफिशिएंट मानलं जातं. खरंतर याला किती वीज लागेल हे तुमच्या वापरावर अवलंबून असतं.
advertisement
4/9
प्रत्येक तासाला किती वीजेचा वापर होतो? : सामान्यतः इंडक्शन कूकटॉपची पॉवर ही 2000 वॉटच्या दरम्यान असते. तुम्ही 2000 वॉटचं इंडक्शन एक तासापर्यंत फूल पॉवरवर वापरलं तर जवळपास 2 यूनिट विज खर्च होते. तसंच कमी पॉवरवर वापर केल्यावर वापर कमी होतो. याचा थेट परिणाम तुमच्या वीज बिलावर पडतो. यामुळे सतत हाय पॉवरचा वापर करणं टाळा. ज्यामुळे वीज बचत होऊ शकते.
advertisement
5/9
दरमहा वीज बिल किती वाढेल? : इंडक्शन शेडगीचं मासिक वीज बिल हे तुमच्या वापरावर अवलंबून आहे. तुम्ही रोज जवळपास 1 तास 2000 वॉटचं इंडक्शन वापरत असाल. तर तुमची 2 युनिट वीज खर्च होईल. म्हणजेच महिन्याला 60 यूनिट खर्च होऊ शकतो.
advertisement
6/9
तुमच्या भागात वीजेचा दर 6 रुपये प्रति यूनिट असेल. तर फक्त इंडक्शन चालवण्याचा खर्च जवळपास 360 रुपये महिना येईल. तसंच हा रेट 8 रुपये ते 10 रुपये प्रति यूनिट असेल तर हा खर्च 480 रुपये तर 600 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तुम्ही ते कमी पॉवर किंवा कमी वेळेसाठी वापरत असाल तर बिलही त्या हिशोबानेच कमी होईल. म्हणजेच योग्य वापर केल्याने इंडक्शन शेगडी महाग नाही तर कंट्रोलमध्ये राहण्याचा ऑप्शन ठरू शकते.
advertisement
7/9
गॅस शेडगीच्या तुलनेत स्वस्त की महाग? : इंडक्शन आणि गॅस शेगडीची तुलना करणं सोपं नाही. कारण दोन्हीचे खर्च वेगळ्या पद्धतीने निघतात. इंडक्शनमध्ये वीज वापरली जाते. तर सिलेंडरमध्ये गॅस वापरला जातो. वीज दर कमी असेल तर इंडक्शन स्वस्त पडू शकतं. पण जास्त यूनिट खर्च होत असतील तर बिल वाढू शकतं. तसंच गॅस शेगडी सतत वापराने स्थिर खर्च देते. अशावेळी तुमचा वापर आणि स्थानिक वीज बिलाच्या दरावर ठरतं की, तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन काय आहे.
advertisement
8/9
इंडक्शनमध्ये वीज बचत कशी होईल : इंडक्शन कूकटॉपचा योग्य वापर केल्याने वीज बिल खुप कमी येऊ शकते. नेहमी फ्लॅट आणि योग्य साइजच्या भांड्याचा वापर करा. ज्यामुळे हीट वाया जाणार नाही. गरजेनुसार पॉवर लेव्हल सेट करा आणि जेवण तयार केल्यानंतर योग्य वेळी बंद करा. वारंवार ऑन ऑफ केल्यानेही ऊर्जा जास्त खर्च होते. या व्यतिरिक्त प्री-हीटिंगपासून बचाव करा आणि अन्न शिजवताना त्यावर झाकण ठेवा. ज्यामुळे वीज वापर कमी होतो.
advertisement
9/9
इंडक्शन कूकटॉप घेताना नेहमीच चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या ब्रांडचा कूकटपॉ खरेदी करा. असं केल्यास तुम्हाला वीज बिल जास्त येणार नाही. यासोबत शॉर्ट सर्किटचा धोकाही राहणार नाही.