TRENDING:

Egg Boil : अंडी उकडण्याची तुमची पद्धत चुकी? शास्त्रज्ञांनी सांगितली परफेक्ट ट्रिक; चव आणि आरोग्य दोन्ही रहाणार Best

Last Updated:
नुकत्याच झालेल्या एका वैज्ञानिक संशोधनाने अंडी उकडण्याची एक अशी पद्धत शोधून काढली आहे, जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल आणि मनात विचार कराल की अरे बापरे असं देखील असतं का? हे तर सगळं आम्हाला माहितच नाही.
advertisement
1/9
Egg Boil : अंडी उकडण्याची तुमची पद्धत चुकी? शास्त्रज्ञांनी सांगितली परफेक्ट ट्रिक; चव आणि आरोग्य दोन्ही रहाणार Best
सकाळी सगळ्यात घरात घाई असते, पण या सगळ्यात प्रोटिन्स घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. अशात सगळ्यात महत्वाचा आणि झटपट बनेल असा पदार्थ म्हणजे अंड. उकडलेलं अंड बनवायला अत्यंत सोपं आणि खायला पौष्टिक. पण, तुम्ही कधी निरखून पाहिलंय का? कधी अंड्याचा पांढरा भाग रबरासारखा चिवट लागतो, तर कधी आतील पिवळा बलक इतका कोरडा होतो की घशाखाली उतरताना त्रास होतो. दिसायला ही साधी प्रक्रिया वाटत असली, तरी परफेक्ट अंडं उकडणं ही एक कला आहे, जी आपल्यापैकी अनेकांना अद्याप जमलेली नाही.
advertisement
2/9
नुकत्याच झालेल्या एका वैज्ञानिक संशोधनाने अंडी उकडण्याची एक अशी पद्धत शोधून काढली आहे, जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल आणि मनात विचार कराल की अरे बापरे असं देखील असतं का? हे तर सगळं आम्हाला माहितच नाही.
advertisement
3/9
अंडं उकडणं इतकं कठीण का असतं?अंड्याचे दोन मुख्य भाग असतात पांढरा आणि पिवळा. गंमत अशी आहे की, हे दोन्ही भाग वेगवेगळ्या तापमानावर शिजतात. पिवळा बलक साधारण 65°C वर शिजतो, तर पांढऱ्या भागाला नीट शिजण्यासाठी 85°C तापमानाची गरज असते. जेव्हा आपण 100°C उकळत्या पाण्यात अंडी टाकतो, तेव्हा पांढरा भाग तर शिजतो, पण पिवळा भाग प्रमाणाबाहेर शिजल्याने तो कोरडा आणि कडक होतो.
advertisement
4/9
शास्त्रज्ञांनी शोधलेली पिरीयॉडिक कुकिंग पद्धतइटलीच्या नॅशनल रिसर्च कौन्सिलचे शास्त्रज्ञ पेलेग्रिनो मुस्टो आणि त्यांच्या टीमने अंडी उकडण्याची एक सायंटिफिक पद्धत शोधली आहे, ज्याला पिरीयॉडिक कुकिंग (Periodic Cooking) असे नाव देण्यात आले आहे.
advertisement
5/9
या पद्धतीमध्ये अंडं सलग उकळत्या पाण्यात न ठेवता, साधारण 32 मिनिटांच्या प्रक्रियेतून नेले जाते. यात अंडं कधी 100°C उकळत्या पाण्यात ठेवले जाते, तर कधी 30°C कोमट पाण्यात. यामुळे पिवळ्या बलकाचे तापमान 65°C वर स्थिर राहते.
advertisement
6/9
परिणाम काय होतो?या प्रक्रियेमुळे अंड्याचा पांढरा भाग मऊ आणि हवा तसा शिजतो, तर पिवळा बलक अजिबात कोरडा न होता एखाद्या क्रिमसारखा मुलायम राहतो. संशोधकांनी या अंड्यांची चव आणि रासायनिक संरचनेची तपासणी केली असता, ही पद्धत पारंपारिक पद्धतीपेक्षा कितीतरी पटीने सरस असल्याचे आढळले.
advertisement
7/9
चवच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीरहे संशोधन केवळ चवीपुरते मर्यादित नाही. शास्त्रज्ञांना असे आढळले की, या विशिष्ट पद्धतीने शिजवलेल्या अंड्यांमध्ये पॉलिफेनॉल प्रमाण जास्त असते. पॉलिफेनॉलमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात.
advertisement
8/9
संशोधनानुसार, ज्यांच्या आहारात पॉलिफेनॉल जास्त असते, त्यांना हृदयविकार, कर्करोग आणि मेंदूशी संबंधित आजारांचा धोका कमी असतो. अंडं उकडणं ही केवळ स्वयंपाकातील एक पायरी नसून ते एक विज्ञान आहे. जर तुम्हालाही हॉटेलसारखी 'क्रीमी' आणि पौष्टिक उकडलेली अंडी खायची असतील, तर विज्ञानाची ही नवी जोड नक्कीच ट्राय करून पाहायला हवी.
advertisement
9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Egg Boil : अंडी उकडण्याची तुमची पद्धत चुकी? शास्त्रज्ञांनी सांगितली परफेक्ट ट्रिक; चव आणि आरोग्य दोन्ही रहाणार Best
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल