उपराजधानीतील एका नामांकित शाळेत आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. करण केशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने सोशल मीडियाचा वापर करून अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढले आणि संधी मिळताच तिचे शारीरिक शोषण केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
इन्स्टाग्रामवर झाली होती ओळख
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी करण केशी याची इन्स्टाग्रामवर पीडितेशी ओळख झाली. हळूहळू मैत्री फुलत गेली, प्रेमाच्या खोट्या आणाभाका घेऊन त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढले. २७ मार्च रोजी आरोपीने मुलीला शाळेत जाऊ नको, असे सांगितले. मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरून निघाली, मात्र शाळेच्या गेटवरूनच करणने तिला आपल्या गाडीवर बसवले. तिथून त्याने तिला थेट फ्रेंड्स कॉलनीतील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे मुलीने विरोझ केला तरी तिला धमकावून तिच्यावर अत्याचार केला. तसेच कोणाला न सांगण्याची देखील धमकी दिली. मात्र शाळेच्या सतर्कतेमुळे तो उजेडात आला.
मुलगी शाळेत गैरहजर असल्याचे पाहून शाळा प्रशासनाने पालकांना फोन करून विचारणा केली. मुलगी तर शाळेत गेली आहे, मग ती गैरहजर कशी? या प्रश्नाने पालकांच्या काळजाचा ठोका चुकला. मुलगी घरी परतल्यानंतर पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने रडत रडत झालेला सर्व प्रकार सांगितला.
आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पालकांनी तात्काळ सदर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी करण केशी विरोधात विविध कलमान्वये आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. मुलं सोशल मीडियाचा वापर करताना पालकांनी देखील लक्ष देणे गरजेचे आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
हे ही वाचा :
