उन्हाळ्यात कैरीचं लोणचं खाऊन कंटाळा येतोय? बनवा खास तक्कू, रेसिपीचा संपूर्ण Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
अगदी सोप्या पद्धतीने हा बनवून तयार होतो. जेवणासोबत तुम्ही खाऊ शकता. यामुळे जेवणाला चव अप्रतिम येते. तर याची रेसिपी कशी बनवायची पाहुयात.
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा म्हटलं की मोठ्या प्रमाणात कैरी मार्केटमध्ये येतात. आपण कैरीपासून वेगवेगळे पदार्थ करतो. त्यामध्ये कैरीचं शरबत असेल किंवा कैरीचे इन्स्टंट लोणचं असेल तर त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे कैरीचा तक्कू होय. अगदी सोप्या पद्धतीने हा बनवून तयार होतो. जेवणासोबत तुम्ही खाऊ शकता. यामुळे जेवणाला चव अप्रतिम येते. तर याची रेसिपी कशी बनवायची पाहुयात.
कैरीचा तक्कूसाठी लागणारे साहित्य
एक मोठ्या आकाराची कैरी किसून घ्यायची. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा तो देखील किसून घ्यायचा. हिंग, लाल तिखट, हळद, जिरे, मोहरी, थोडीशी साखर आणि लोणच्याचा मसाला एवढेच साहित्य या करता लागणार आहे.
कैरीचा तक्कू बनवण्याची कृती
सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये कैरीचा कीस आणि कांद्याचा कीस एकत्र करून घ्यायचा. त्यानंतर साधारणपणे त्यावरती पाऊण चमचा हळद टाकायची. त्यानंतर पाऊण चमचा तिखट, एक ते दीड चमचाभर लोणच्याचा मसाला, मीठ आणि एकदम थोडीशी साखर आणि हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं.
advertisement
आता नंतर याला एक तडका द्यायचा. जिरे, मोहरी टाकून घ्यायचं आणि ते चांगलं तडतडले की यावरती टाकून घ्यायचं. सर्व एकत्र करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा कैरीचा तक्कू बनवून तयार होतो.
तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा तुम्हाला देखील खूप असा आवडेल.
Location :
Aurangabad Cantonment,Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 3:12 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
उन्हाळ्यात कैरीचं लोणचं खाऊन कंटाळा येतोय? बनवा खास तक्कू, रेसिपीचा संपूर्ण Video







