TRENDING:

कधी द्राक्ष बागेत मिसळ खाल्ली का? ही आहेत नाशिकमधील टॅाप 3 ठिकाणं

Last Updated:
मिसळ हा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. नाशिकमधील मिसळ खायची असेल तर या 3 ठिकाणांना पहिली पसंती असते.
advertisement
1/5
कधी द्राक्ष बागेत मिसळ खाल्ली का? ही आहेत नाशिकमधील टॅाप 3 ठिकाणं
भारतात प्रत्येक भागात वेगवेगळी खाद्य संस्कृती आहे. महाराष्ट्रातही प्रत्येक ठिकाणचे काही खास पदार्थ प्रसिद्ध आहेत. मिसळ हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ असला तरी प्रत्येक भागात बनवण्याची पद्धत भिन्न आहे. <a href="https://news18marathi.com/maharashtra/nashik/">नाशिकमध्ये</a> मिसळवर ताव मारण्याचा विचार असेल तर आपल्यासाठी 3 उत्तम पर्याय आहेत.
advertisement
2/5
नाशिकमधील साधना मिसळ प्रसिद्ध आहे. चुलीवरची मिसळ म्हणूनही या मिसळला ओळखले जाते. नाशिकमधील बार्दान फाटा या ठिकाणी मटकीची मिसळ फरसाणासोबत दिली जाते. एकाच ताटात कांदा आणि लिंबू त्याचबरोबर अनलिमिटेड रस्सा आणि तर्री, मोठे पापड, दोन आकाराचे जंबो पाव आणि अगदी लहान दही डिश अशी ही मिसळ आहे. खवय्ये आवर्जून या ठिकाणी येत असतात.
advertisement
3/5
भारतातील पहिले ग्रेप रूफ रेस्टॉरंट म्हणून ग्रेप अँबसीची ओळख आहे. द्राक्षाच्या आवारात जेवण किंवा खाणे ही येथील सर्वात मनोरंजक गोष्ट आहे. चटपटीत आणि मोहक अशा मिसळ सोबत ते त्यांच्या अंगणातील ताजी द्राक्षे आणि गोड ड्रायफ्रूट लस्सी देखील देतात. हे ठिकाण नाशिकच्या सुप्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे.
advertisement
4/5
शाम सुंदर मिसळ ही नाशिकमधील प्रसिद्ध मिसळ पैसी एक असून ती सातपूर एमआयडीसी आहे. येथे बसण्याची मोठी जागा आहे. येथे मिळणारी मिसळ चवदार आहे. त्यात उत्तम प्रकारे संतुलित मसाले, मिरची आणि तेल आहे. या ठिकाणी पाव ताजे सर्व्ह केले जातात. येथील चवीमुळेच ग्राहक आकर्षित होतात.
advertisement
5/5
मिसळ म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. आपणही मिसळप्रेमी असाल तर नाशिकमधील या तीन पैकी एखाद्या ठिकाणाला आवर्जून भेट देऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
कधी द्राक्ष बागेत मिसळ खाल्ली का? ही आहेत नाशिकमधील टॅाप 3 ठिकाणं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल